निसर्गात विविध आकाराची, रंगाची, चवीची आणि सुंगध असलेली फळं असतात. प्रत्येक ऋतूतील फळांचा आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळते यासाठीच जेव्हा तुम्ही जेवणाआधी फळे खाता तेव्हा फळे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करतात.
याचे प्रमुख कारण म्हणजे फळांमध्ये पुरेसे फायबर्स असतात. फळे आणि अन्नाचे फर्मेंटेशन झाल्यामुळे तुमच्या पोटातील पाचकरस सक्रिय होतो. ज्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते.
मात्र जर तुम्ही जेवणानंतर फळे खाल्ली तर ही क्रिया व्यवस्थित होत नाही आणि अन्नाचे पचनही नीट होत नाही. याचबरोबर कोणती फळे केव्हा खावीत याविषयी काही नियम आहेत.
आपल्यापैकी बरेच जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फळं खातात. अनेकांचा समज असा असतो की जेवणानंतर फळं खाल्ली की खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. पण काही फळं अशी आहेत जी जेवणानंतर लगेच खाल्ली तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं.
फळे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा प्रमुख स्त्रोत आहे. निरोगी राहण्यासाठी डॉक्टर रोज फळे खाण्याची शिफारस करतात. यासाठी एक अतिशय लोकप्रिय म्हण आहे – ‘दिवसाला एक सफरचंद खा, डॉक्टरांपासून दूर रहा’. सोप्या भाषेत सांगायचे तर रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर राहतात.
त्याचबरोबर रोज दोन ताजी फळे खाल्ल्याने तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. तसेच वजन नियंत्रणात राहते. शिवाय, जुनाट आजारांचा धोकाही कमी होतो.
आयुर्वेदानुसार रोज सकाळी फळे खाल्याने दुहेरी फायदा होतो. अकाली फळे खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सूर्यास्तानंतर फळे खाऊ नये.
आयुर्वेदातही असं सांगिलंय की आंबट फळं रिकाम्या पोटी खाल्ली तर त्रास होतो. त्यामुळे पोटात काहीही नसेल तेव्हा इतर फळं खाल्ली तर चालतात पण आंबट फळं खाऊ नयेत. सफर चंदाचे सेवन सकाळी नाश्ता करताना करणे उत्तम मानले जाते. यात पेक्टिन नावाचा तत्त्व उपस्थित असतो जो बीपी लो करतो आणि कोलेस्ट्रालला कमी करतो.
रात्रीच्या वेळेस जेवणात सफरचंद खाऊ नये कारण रात्री पेक्टिन च्या पचनामध्ये अडचण येते आणि यामुळे पोटात अॅसिडीटी वाढते. केळींचे सेवन दुपारी अर्थात जेवनामध्ये करायला हवे. केळी आपल्या शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढवण्यात मदत करतत. केळींचे सेवन रात्री मुळीच करु नये कारण यामुळे अपचनाची समस्या वाढते.
आयुर्वेदात संध्याकाळी 4 नंतर फळे खाण्यास मनाई का आहे ते जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार संध्याकाळी सूर्यास्तानंतर फळे खाल्याने झोपेत अडथळा निर्माण होतो. याव्यतिरिक्त, पचन प्रक्रियेवर देखील परिणाम होतो.
आपल्या सर्वांना माहित आहे की फळांमध्ये कर्बोदके असतात या कार्बोहायड्रेट्सचे साखरेमध्ये सहज रूपांतर होते. यामुळे शरीरा ला झटपट ऊर्जा मिळते. तथापि, फळांच्या सेवनाने र’क्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे रात्रीची झोप नाहीशी होते. या व्यतिरिक्त, चयापचय दर देखील सूर्यास्तानंतर मंद होतो, ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स पचवणे कठीण होते. यासाठी सूर्यास्तापूर्वी फळांचे सेवन करणे योग्य आहे.
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे अधिक फायदेशीर आहे. रात्री सुमारे दहा तासांच्या विश्रांतीनंतर पोट रिकामे राहते. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने शरीराला झटपट उर्जा मिळते तसेच चयापचय वाढते.
त्याचबरोबर जेवणानंतर अर्ध्या तासाने फळांचे सेवन करावे. फळे, भाज्या आणि दुधासोबत कधीही खाऊ नयेत. दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्यांसोबत फळांचा वापर केल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
काही फळं तुम्ही सकाळी खाल्लीत तरच त्यांचा शरीराला अधिक फायदा होतो. ही फळं जर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर खाल्लीत तर तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होतो.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याची आम्ही पुष्टी करत नाहीत. या उपायांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा. धन्यवाद.