स्वामींच्या मंदिरात गेल्यावर स्वामींसमोर ऊभं रहायचं, अन् थोडंस पुटपुटतच स्वामींना तक्रार करायची. रागवायचं त्यावर एकटा होता आई बाप कुणीही नाही, खूप दु:ख भोगलेलं, म्हणून हा रोजचा दिनक्रम होता त्याचा.
हे पुटपुटणं कुणास ऐकू जाऊ नये म्हणून तो गर्दी नसताना भर दुपारी यायचा, कुणीही नसायचं त्यावेळी. त्या दिवशी त्याला गावाला जावं लागलं परततांना संध्याकाळ झाली, त्याच्या लक्षात आलं; आता गर्दी, त्यांत गुरुवार पण दिनक्रम तो दिनक्रम. तो गेला.
मंदिरात खूपच गर्दी. लांबूनच दर्शन घ्यावे लागले. म’न जास्त ऊद्वेगी झाले. गर्दी पाहून जास्त म’नातल्या म’नात पुटपुटत तो बाहेर पडला. चप्पल ठेवली होती तिथं गेला तिथं एक अतिशय म्हातारा गृहस्थ ऊठू लागला. पण त्याचा तोल गेला. यानं पटकन् आधार दिला
“आजोबा, सांभाळून “तो एकदम् म्हणला. त्या म्हाता-यानं पाहिलं त्याच्याकडं, हं. हसला तो व म्हणला “हेच माझं काम आहे रे. याचा अर्थ त्याला कळला नाही “म्हणजे? ” त्यानं विचारलं. तो म्हातारा म्हणला “कुणाचा तोल जाऊ नये म्हणून सावरायचं. तरीही पेलायचं सारंकाही. तू आज रागावला नाहीस. भरभरुन बोलला नाहीस. मंदिरात ..!”
तो म्हातारा म्हणला आणि हा आश्चर्यचकित झाला. ” असा पाहतोस काय? तुझं ऐकल्याशिवाय माझं पोटंच भरत नाही. म्हणूनच तुझी वाट पहात बाहेर थांबलोय. अरे असा पाहतोस काय? मी तुझा स्वामी ..!
” हे ऐकताच तो स्वामींपायी कोसळला. त्यानं चरणांस घट्ट मिठी मारली. अश्रूंचा अभिषेक आरंभिला. लोकं येताजाता आश्चर्यानं पहात राहिली. वटवृक्षाला घट्ट मिठी मारलेल्या त्याच्याकडं. ॥श्री स्वामी समर्थ॥ कथेतील बोध कमेंट करुन नक्की सांगावा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!