अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे किंवा वाचनात येणे म्हणजे भाग्यच ! असाच एक अनुभव सांगायला आनंद होत आहे आणि समाधान देखील, कारण स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे.
मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते.
स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभवलेली माणसं हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामींच्या कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
प्रामाणिकपणाचे फळ हे खूप मोठे असते. मुंबईहून कोणी एक श्रीमान गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले. सोबत एक ब्राम्हण आणला असून पूजेचे साहित्य आणि पक्वानांनी भरलेले ताट घेऊन श्री स्वामींच्या दर्शनासाठी दरबारात येतात. त्या वेळेला स्वामी महाराजांची स्वारी स्वस्वरूप आनंदात रममाण झालेली होती. सोबत आलेला ब्राह्मण पूजेचे आणि नैवेद्याच ताट स्वामींसमोर ठेवत असताना स्वामी महाराज
त्याच्याकडे बघतात आणि बोलतात पाच हजार रुपये रखे है ले जावो, स्वामी महाराज असे वाक्य तीन-चार वेळा बोलतात, परंतु ब्राह्मणाला काहीच समजत नाही आणि तो बोलतो स्वामी, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो, पाच हजार कुठून मिळणार? त्यानंतर स्वामी थोडं हसले आणि मागील बाजूला कुंपण होते त्याच्या आतमध्ये नुकताच एक फकीर आणि काळा कुत्रा आला होता. स्वामिनी नैवेद्याच ताट फकिराला द्यायला
सांगितले आणि ब्राह्मणाने आज्ञेप्रमाणे ते दिले, फकीर आणि तो काळा कुत्रा दोघांनी मिळून सर्व ताट ग्रहण केले. मात्र साधारणता चार-पाच घास उष्टे ठेवले, त्यानंतर त्या गृहस्थांनी स्वामींची यथासांग पूजा केली आणि बिऱ्हाडी आहे. आल्यानंतर प्रासादिक ताट ग्रहण करावे की नाही असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी नारायणराव, वेंकट शास्त्रीय आदी मंडळींना शंका विचारली परंतु याचे उत्तर स्वामिंच देतील असे सांगून सर्व मंडळी
स्वामींच्या दरबारात आली आणि तेव्हा स्वामी बोलले, खाना है तो खावो नही तो बीछला देवो, गरगर पंचायत क्यो करते हो, स्वामींचे शब्द ऐकून प्रभू गृहस्थ निःशंक झाले आणि मनोभावे सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. पुढे दुसर्या दिवशी स्वामी दर्शन घेऊन प्रभू गृहस्थ आणि ब्राम्हण मुंबईला निघतात. मुंबईस प्रभू गृहस्थ त्यांच्या मावशी इकडे येतात, आल्यानंतर प्रभूंचा ब्राम्हण यांच्या मावशीच्या घरी आचारी म्हणून काम करत होता आणि त्यांची मावशी भरपूर श्रीमंत धनसंपन्न होती. या ब्राम्हण
आचाऱ्याने भरपूर विश्वासाने त्यांच्याकडे काम केल्याने मावशी खुश होत्या. आणि या आनंदाच्या भरात यांनीही ब्राह्मणाला पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले. ब्राह्मणाच्या म’नात नसताना सुद्धा पाच हजार रुपये मिळाले आणि स्वामी वाणीची प्रचिती आली. स्वामींचा हा चमत्कार बघून प्रभू गृहस्थ हेसुद्धा आश्चर्यचकित झाले आणि आनंदात येऊन स्वामी भक्तीच्या भावनेने सर्वांनी एकत्र स्वामी नावाचा जय जय कार केला बोला
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या लिलेतून समजते की प्रामाणिक पणे सेवेचे फळ स्वामी स्वतः खूप मोठे देतात. यात बोधाचा खजिना दडलेला आहे त्यामुळे आपलं जीवन सुवर्ण वचनांनी समृद्ध करायचे आहे. प्रभू गुरु असताना एक फकिराचे आणि कुत्र्याचे उष्टे अन्न खायला सांगून समाजातील उच्च नीच वर्णीय विषमतेवर प्रहार केला. स्वामिनी प्रत्यक्ष कृतीद्वारे आणि स्वामींचा दरबारात ईश्वराच्या नजरेत हे सर्वजण
एकसमान आहेत ही शिकवण दिली. या साध्या भोळ्या आचारी ब्राह्मणाला पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन प्रामाणिक कर्म कधीच वाया जात नाही, त्याचे फळ नक्कीच मिळते आणि कभी छोडणा नही असे बोलून आत्मविश्वास निर्माण करून पाच हजार रुपये देऊ केले. या प्रसंगातून स्वामी महाराज आम्हा सर्वांना, आजच्या पिढीला पुन्हा एकदा प्रामाणिक कर्म करण्याची प्रेरणा देत आहे, आपण
आपले कर्म प्रामाणिकपणे केले तर त्याचे फळ वाया जात नाही. कारण त्याचे फळ देणारे स्वतः स्वामीच आहेत हा विश्वास ठेवून योग्य वेळी आपल्या हक्काचे आपल्याला स्वामी देतातच. कुठल्याही संकटात असाल तर स्वामींना आठवा, करा आपल्या हातून झालेल्या चुका मान्य करा. आपले संकट स्वामींवर अभेद्य विश्वास ठेवून लढावे. स्वामीराया असंच पाठीशी रहा.
आनंद कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!