स्वामी म्हणतात, श्रीगुरूचरित्रातून आपण काय शिकतो? येथे जाणून घ्या.

आपली चुक नसताना झालेला त्रास आपले प्रारब्ध असते. आपण ब्रह्मांडव्यापी वैश्विक शक्तिंच्या दिव्य योजनेचे माध्यम असतो परमात्मा आपल्याकडून कार्य करवून घेत असतो.आपण सर्वजण सर्वव्यापी परमात्म्याचे मदतीचे माध्यम असतो.

एकदा शंका जावून ठाम श्रद्धा आली कीवाईट विचार,शंका आपोआपच दूर होवून मार्ग प्रकाशित होवू लागतात. सगुण मनुष्यरूपातच बहुतेकदा गुरू भेटतात त्यासाठी नामस्मरण चिंतनाने आपली पात्रता वाढवत राहणे गरजेचे आहे ज्याने सद्गुरु प्राप्ती होवून जीवन सार्थक होईल.

काळ हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या सगुण रूपालाही चुकलेला नाही म्हणून व्यर्थ चिंता सोडून ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करावी. आपली पूर्वजन्माची किंवा या जन्माची काही अजाणतेपणी केलेली काही पापे असतात ती मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त देतात. नामस्मरणाने प्रारब्धभोगाची तीव्रता कमी होते.

परमात्म्याने निवडून दिलेले पात्र आपल्याला निभवायचे आहे जसे एक वडिल,मुलगा,नातू,पती,सासराही पुरूषांची. तर पत्नी, मुलगी, नात, सून, आई ही स्त्रियांना निवडून दिलेली पात्रं आहेत ती आपल्याला निभवायची आहेत म्हणजेच इथे असे सूचित करायचे आहे कि कर्तव्यपालन ही सुद्धा परमात्म्याची चिंतनाचा मार्गच आहे.

।।श्री गोंदवलेकर महाराज।। परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे.
आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्या शिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही.

सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल ? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती.

ती म्हणाली, “आपण श्रीकृष्णाला विचारू.” तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला, “द्रौपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो.” त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले.

श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की, “भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आत जा आणि बांगडया वाजवून नमस्कार कर.” त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली, आणि बांगडया वाजवून नमस्कार केला.” त्यांनी लगेच तिला “अखंड सौभाग्यवती भव” म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी. तेव्हा ते म्हणाले, “द्रौपदी, ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग.” ती म्हणाली, “माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे.” भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु

आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही.

नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल.
नामस्मरणात स्त्रीपुरूष, श्रीमंतगरीब, हे भेद नाहीत. फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *