स्वामी म्हणतात, स्वामींच्या भक्ताला दिलेली वे’दना ही, स्वामींना दिलेली वेदना आहे, वाचा सत्य अनुभव.

स्वामी महाराज वटवृक्षाखाली ध्यान करीत होते. बाजूला सर्व सेवेकरी हात जोडून उभे आहेत.स्वामी जागे होवून कधी दर्शन देतात याची वाट पाहत आहेत. तेवढ्यात एक तरुण युवक सेवेकरी कमळाचे फुल घेवून स्वामिना वाहण्यासाठी आला.

एक सेवेकरी म्हणाला काय हो ? हे कमळाचे फुल कशाला आणले? युवक म्हणाला, अहो स्वामी महाराजांना वाहण्यासाठी आणले आहे पण स्वामी तर ध्यानस्थ बसले आहेत, तेव्हा हे फुल मी स्वामींच्या चरणाजवळ ठेवतो आणि माझ्या कामाला जातो.

त्यावर सेवेकरी पुन्हा बोलला, तुम्हाला काय कळते का नाही ? ते फुल बघा, त्याला चिखल लागला आहे, तसे वाहणार का स्वामीना. मी पहा मी गुलाबाची फुले आणली आहेत, स्वामी महाराजांना ती आवडतात, मी जुना सेवेकरी आहे मला सर्व माहित आहे कि स्वामींना काय आवडते ते.

युवक : बर ठीक आहे, नाही वाहत, परत घेवून जातो, मला माफ करा. तेवढ्यात स्वामी ध्यानस्थ अवस्थेतून जागे होतात, त्या युवकाचा हातातील फुल आपल्या हातात घेतात आणि त्या रागात बोलणार्या सेवेकर्याला म्हणतात. स्वामी: का रे ? स्वतःला फार अक्कलवान समजतोस का ? त्याने ते कमळाचे फुल प्रेमाने माझ्याकरिता आणले ना.तुला त्याला लागलेला चिखलच कसा रे दिसला ?

ते फुल तुला दिसले नाही ? ज्या डोळ्याने “चिखल” पाहिलास त्या डोळ्याने “फुल” का पहिले नाही ? आम्हाला काय आवडते आणि काय नाही हे ठरवणारा तू कोण आहेस ? “मी जुना आहे” असेही म्हणालास, आम्हाला सर्व सारखेच आहेत, अध्यात्मात, भक्तीत, सेवेत कोण किती वर्षापासून आहे हे महत्वाचे नाही तर त्याचे प्रेम, विश्वास किती आहे यावर तो श्रेष्ठ ठरतो हे विसरू नकोस.

तुला अहंकाराने झपाटले आहे .तुला गर्व झाला आहे तुझ्या सेवेचा तुझी गुलाबाची फुले तुलाच ठेव कारण त्याला काटे आहेत. तुझे शब्द हे त्या गुलाबाच्या काट्यासारखे आहेत. म नाला टोचणारे आणि असली काटेरी फुले आम्ही स्वीकारत नाही, चल दूर हो.

सेवेकरी : स्वामी, माफ करा मला, मी खूप चुकलो मी जुना आहे, मला सर्व माहिती आहे याचा मला गर्व झाला होता पण आपण तो एका क्षणात उतरविलात स्वामी मला माफ करा

स्वामी महाराज : अरे दंभ हा अध्यात्मात भक्ताला मागे खेचतो आणि नुसते खेचत तर तो गुरुपासून दूर करतो. माझ्या भक्ताला बोललेला एक एक शब्द हा मलाच लागत असतो.

“माझ्या भक्ताला दिलेली वेदना हि माझ्या मनाला दिलेली वेदना आहे हे विसरू नकोस..!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !!”

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *