स्वामीं म्हणतात, नित्यनेम करणे म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या.

रोज थोडेसे वाचन, त्यानंतर म’नन, म’ननानंतर त्याप्रमाणे आचरण, आणि शेवटी गुरूस अनन्यशरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे, आणि हाच त्याचा नि’त्यनेम होय.

आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; सा’धकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे.

नित्यनेम करणे म्हणजे सर्वकाळ नि’त्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नि’त्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो प’रमात्मा त्याला विसरून, विषय जे अ’नित्य त्यांत पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होईल असे जे करणे त्याला नि’त्यनेम म्हणतात.

आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही; म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे म’नन करावे, म्हणजे त्याची सवय होते.

जो अखंड ना मस्मरण करतो तो नेहमीच नि’त्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंदबुवांनीच.

आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे सा’धन आहे. गुरू सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला श’रण जावे.

सा’शंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्या’नात ठेवावे. श्र’द्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. स’माधान हेच स’र्वस्व आहे अशी श्र’द्धा ठेवावी.

जगाच्या मा’न अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि का’मवासना यांच्यापेक्षाही मा’न हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सा’वध असावे.

जिथे आपल्याला मा’न मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर “हे भगवंताचे देणे आहे” असे म’नापासून समजावे.

जो खरा मोठा असतो तो कधी मा’नाची इ’च्छा धरीत नाही, आणि मा’न त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मा’न आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल.

ज्याप्रमाणे थ’र्मामीटरने आपला ता’प आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे सा’धन करताना आपले आपल्याला स’माधान किती झाले हे पाहिले पाहिजे.

सा’धकाने जगातले दो’ष पाहू नयेत, कारण त्या दो’षांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेषणा, मा’न, फार घा’तक आहेत. मोठमोठे सा’धकसुद्धा त्यांच्यापायी अ’धोगतीला जातात. तसेच, पैसा आणि का’मवासना यांच्या म’र्यादा ओलांडल्यामुळे मोठे सा’धनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पा’श हाच खरा पा’श. तोच आपल्याला सर्व बं’धनांपासून मु’क्त करून शाश्वत स’माधानाचा लाभ मिळवून देतो.

जाता-येता देवाला नमस्कार करावा, “राम, राम” म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुनः सुटणार नाही. भगवंताचा पाश हा पाशच खरा. पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. “श्री स्वामी समर्थ.”

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *