एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला. तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशान भूमीकडे जाऊ लागले.
तोच एक व्यक्ती तिथे आली, आणि तिरडी धरणाऱ्या पैकी. एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे १५ लाख रुपये देणे आहे, जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार.
जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागले. तेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की, आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही, त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.
तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की, मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही. आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली. जेव्हा खूप वेळ झाली, तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली, ही गोष्ट जेव्हा
मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली, तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू, पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की, हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका.
मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन. आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला की, खरे पाहता गोष्ट अशी आहे की, मेलेल्या माणसाकडून १५ लाख येणे नाही. तर उलट मी त्याला देणे आहे, परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळलो.
आता मला कळाले की, या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली. आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते.
आशय – मुलगी असणारे खुप भाग्यवान आहेत, कारण मुली आपल्या आईवडिलांनाच आपली दौलत समजतात. म्हणुनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे ना की दुःखी. अशी प्रार्थना करा की, प्रत्येकाला एक मुलगी मिळावी जी वडिलांना नेहमी स्मरणात ठेवेल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!