स्वामी म्हणतात, अहंकार बाळगू नको अन्यथा तुझा शेवट निश्चित आहे, श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो, आपण जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करतो. कधी कधी खूप कष्ट करतो, प्रत्येक अडचणी वर मात करत आपला प्रपंच सांभाळत सांभाळत परमार्थही करत असतो. प्रत्येकाचे काम वेगळे असते. माणूस ज्यावेळी गरीब असतो, ज्यावेळी त्याच्याजवळ धन नसते त्यावेळी तो नेहमीच संयमाने वागत असतो.

मात्र एकदा धन मिळाले की तो लोकांना तुच्छ लेखू लागतो त्याचा अहंकार वाढतो. पण हा अहंकार माणसाच्या नाशाला कारणीभूत असल्याचे स्वामी सांगतात. त्यामुळे अहंकार करताय तर सावधान कारण तुमचा अंत निश्चित आहे असा संदेश जणू महाभारतानेही दिलाय.

याबाबत एक दृष्टान्त बघू.एका गावात एक राजा असतो तो विद्वान असल्याने व युद्ध कलेमध्ये पारंगत असल्याने प्रत्येकाशी तो नेहमीच उद्धट बोलत असतो.आपल्या राज्यातील प्रजेला नेहमीच त्रास देत असतो.याबाबत कोणी काही बोलल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षा देत असतो. त्यामुळे राजाविरुद्ध बोलण्यास कोणीच तयार होत नसते. त्यामुळे राजा म्हणेल ती पूर्व दिशा असेच काही चालू असते…

एका दिवशी राजवाड्या मध्ये सर्व विद्वान लोक एकत्र आलेले असतात.त्यावेळी एक ब्राह्मण व्यक्ती त्या राजाला त्याच्या अहंकाराविषयी समजावून सांगत असतो. मात्र त्या राजाला त्याचे काहीच वाटत नाही, उलट त्या व्यक्तीचा त्याला राग येतो,यानंतर सैनिकांना सांगून त्याला बंदी करण्यास सांगितले जाते.

सैनिकांनी बंद केल्यानंतर बिरबलाला वाटते की या माणसाची चूक नसताना राजा चुकीची कृती करतएका गावात एक राजा असतो तो विद्वान असल्याने व युद्ध कलेमध्ये पारंगत असल्याने प्रत्येकाशी तो नेहमीच उद्धट बोलत असतो.आपल्या राज्यातील प्रजेला नेहमीच त्रास देत असतो.याबाबत कोणी काही बोलल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षा देत असतो. त्यामुळे राजाविरुद्ध बोलण्यास कोणीच तयार होत नसते

त्यामुळे राजा म्हणेल ती पूर्व दिशा असेच काही चालू असते. एका दिवशी राजवाड्या मध्ये सर्व विद्वान लोक एकत्र आलेले असतात.त्यावेळी एक ब्राह्मण व्यक्ती त्या राजाला त्याच्या अहंकाराविषयी समजावून सांगत असतो. मात्र त्या राजाला त्याचे काहीच वाटत नाही, उलट त्या व्यक्तीचा त्याला राग येतो,यानंतर सैनिकांना सांगून त्याला बंदी करण्यास सांगितले जाते.

सैनिकांनी बंद केल्यानंतर बिरबलाला वाटते की या माणसाची चूक नसताना राजा चुकीची कृती करत आहे. त्यामुळे राजाला पटवून सांगावे म्हणून एक शक्कल लढवून राजाला म्हणतो की, महाराज आपण याला बोलण्याची संधी द्यावी, यानंतर त्याला मृत्युदंड द्यावा.अन्यथा तुम्हाला याचे पातक लागून आपल्या राज्यावर काहीतरी वाईट आपत्ती येईल.

हे ऐकून राजा थोडा हादरतो व त्याला बोलण्याची संधी देतो. त्यावेळी तो विद्वान ब्राह्मण राजाला वंदन करून म्हणतो,हा जन्म आई-वडिलांनी दिला त्यामुळेच तुम्ही जग पाहू शकला. त्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात. जर या धरणी मातेने तुम्हाला दाणे दिले नसते धान्य दिले नसते तर तुम्ही जगू शकला नसता.

तसेच तुमचे आई-वडिलांनी जर हे राज्य मिळवले नसते तर तुम्ही राजे झालं नसता. त्यामुळे जे काय आहे ते निसर्गाकडूनच किंवा वडिलोपार्जितच मिळालेले आहे, त्यामुळे याचा कोणीही अहंकार बाळगू नये. जो कोणी व्यक्ती मोठा असेल त्यांनीही गर्व बाळगू नये. कोणी छोटा असेल त्यानेही गर्व करू नये. कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते.

राजाला आपली चूक कळते यानंतर राजा सर्व विद्वानांची क्षमा मागून यापुढे आपण अहंकार करणार नाही असे सांगतो.मित्रांनो या कथेतून तुम्हाला हेच सांगितले आहे की तुम्ही जे काही आहात ते तुमच्या पूर्व सुकृत संचिता मधून, त्यामुळे कधीही आपल्या ताकतीचा गर्व करू नका अन्यथा आपला अंत निश्चित आहे.महाभारतामध्ये दुर्योधनाला आपल्या ताकतीचा खूप गर्व झाला होता.

ज्यावेळी पांडवांनी राज्य मागणी केली त्यावेळी, सुईच्या टोकावर मावणार नाही एवढे देखील तुम्हाला जागा मिळणार नाही असे उदगार दुर्योधनाने काढले. यानंतर महाभारतामध्ये दुर्योधनाची अवस्था काय झाली हे आपण पाहिलेच आहे.

त्यामुळे कधीच अहंकार करू नका. कारण ज्या गोष्टीसाठी अहंकार तुम्ही करत आहात, तुम्ही जर राहिलेच नाहीत तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार सुद्धा नाही त्यामुळे अहंकार कधीच करू नका.

स्वामी सांगतात पैशाचा अहंकार करू नका किंवा पदाचाही अहंकार करू नका. कारण पैसा आज आहे तर उद्या नाही. तुम्हाला मिळालेले जे पद आहे ते केवळ क्षणिक आहे.आणि ते विधात्याने दिलेली देणगी म्हणून त्याकडे पहा. जर तुम्ही पदावर असताना इतरांशी वाईट वागत असाल, लोकांना त्रास देत असाल तर याचा परिणाम नक्की होईल. ज्या दिवशी तुम्ही पदावरून पायउतार व्हाल त्यावेळी तुम्हाला लोक खूप त्रास देतील त्यामुळे अहंकार कधीच बाळगू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *