अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. परंतु अजूनही अंसख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी ? किंवा स्वामींची पुजा कशी करावी ? याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. यासर्वाचा विचार करून, त्याविषयी पुढिल महिती आहे.
स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मुर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मुर्ती असेल तर रोज मुर्तीला स्ना’न घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती पुष्पे (फुले) स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एक ही फुल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशी पत्रे स्वामींना वाहावित.
नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर मग दिप अगरबत्ती ओवाळून, आपण जी भाजी भाकरी खातो, त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर, पेढ़े किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुध्दा स्वामी महाराजांना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही.
अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा अभक्ष्य (मांसाहार) सोडून ईतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. ही बाब सदैव ध्यानात ठेवा. सकाळी उठल्या बरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरुन घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा.
प्राणी मात्राबद्दल दया असू द्या. कुणाबद्दल ही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे, हिच भावना सदैव असू द्या. काही कारणास्ताव एखादे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्या ऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा ह्रदयांतून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचे आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!