मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतीपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला.
अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय झाला.
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो.
या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबा ची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. मात्र विजय कशाचा?
कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.
याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.
आज आपणही दीन, हीन बनलो असून वाईट प्रवृतींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतीज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करायची.
आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजयपताका उभारण्यासारखे आहे.
गुढी पाडवा हा सण सांस्कृतिक व धार्मिक गोष्टींसोबतच पर्यावरण व निर्सगाशीही जोडला गेला आहे. गुढी उभारतांना आपण कायम त्या गुढीवर कडुलिंब व आंब्याच्या पानांचं तोरण लावतो. त्यानंतर ही पानं खाल्लीदेखील जातात.
परंतु हे तोरण का लावण्यात येतं किंवा ही पानं का खावीत हे फार कमी जणांना माहित आहे. वसंत ऋतू सुरु झाला की उन्हाच्या झळा बसू लागतात. परिणामी, या काळात उष्णतेचे विकारही सुरु होतात. हे उष्णतेचे विकार होऊ नये वा उन्हाळा बाधू नये यासाठी कडुलिंबाची पानं खाल्ली जातात.
आणि मित्रांनो गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्या साठी आपण जी काढी घेतो ते प्रथम स्वच्छ धुवून, पुसून घ्या. त्यानंतर त्याला एक रेशमी वस्त्र बांधून त्यावर एक चांदी, तांब्या किंवा अन्य कोणताही स्वच्छ तांब्या ठेवा. गुढीभोवती रांगोळी काढावी.
त्यानंतर हा तांब्या व वस्त्र गुढीला व्यवस्थित बांधून घ्या. या तांब्यावर मग कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. तसंच साखरेची माळ बांधावी. गुढी उभारल्या नंतर त्यावर हळद, कुंकू, फुले वाहून तिची पुजा करावी. तसंच उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पुन्हा नमस्कार करुन उतरवावी.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!