अहमदनगरचे नाना रेखी हे त्यांच्या काळातील एक महान ज्योतिषी होते त्यांना घुबडांची भाषा परिचित होती आणि म्हणूनच ते पिंगळा ज्योतिषी म्हणून ओळखले जात.
एकदा नाना रेखी मुंबईला गेले असता त्यांना संत स्वामीसुत यांना भेटण्याचा बहुमान मिळाला. स्वामी सुतांनी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची कुंडली बनवण्यास सांगितली.
स्वामीसुतांकडून माहिती घेऊन त्यांनी ती बनविली. स्वामीसुतांनी त्यांना स्वहस्ते ती स्वामी चरणी अर्पण करण्यास सांगितली. त्यानंतर नाना रेकींना अक्कल कोटला जाण्याची तीव्र इच्छा झाली. त्यामुळे नंतर ते आपल्या पत्नीसमवेत अक्कलकोटला गेले.
श्री स्वामी महाराज त्यावेळी दर्ग्यावर बसले होते, जेव्हा ते श्री स्वामीजींच्या चरणी नतमस्तक झाले तेव्हा त्यांची पत्नी सखू यांना तिच्या भूतकाळातील आयुष्याची आठवण झाली आणि श्री स्वामीजींनी तिला बालयोगी च्या रूपाने दर्शन देऊन चेलीखेडाच्या स्तंभातून स्वत:ला प्रकट केले हे आठवले.
स्वामी महाराजांची भेट घेतल्यावर, नाना रेखी यांनी तयार केलेली कुंडली तत्काळ श्री स्वामीजींच्या सन्मानार्थ सादर केली. त्यावर हळदी कुंकुमादी अर्पण करून ती वाचली, त्यानंतर श्री स्वामी कुंडलीशी सहमत झाले आणि देखता क्या है नौबत बजाव असा आदेश दिला, नाना रेखींचा हा खूप मोठा आदर होता.
श्री स्वामीजींनी आपला हात नाना रेखींच्या उजव्या हातावर ठेवला आणि त्यांच्या तळहातावर विष्णुपाद निळ्या रंगात उमटविला. ही खूण शेवटपर्यंत त्याच्या तळहातावर राहिली. त्यानंतर श्री स्वामी म्हणाले, मी तुम्हाला माझें आत्मलिंग दिले आहे तुम्ही आता जाऊ शकता.”
नाना रेखी यांना वाकसिध्दी मिळाली. त्यांना श्री स्वामी जींनी परिधान केलेल्या चर्म पादुका देखील प्राप्त झाल्या. अहमदनगरला परत आल्यावर त्यांनी मंदिर बांधले आणि त्या चर्मपादुका ठेवल्या. तेथील विद्वान पंडितांनी यावर आक्षेप घेतला आणि नाना रेखींचा खूपच छळ ही केला. परंतु , श्री स्वामींच्या कृपेमुळे सर्व विरोध शांत झाला.
नाना रेखींनी स्थापन केलेला स्वामी मठ आजही ही नगरमधील गुजर गल्लीत रेखी मठ म्हणून प्रसिद्ध आहे, आजही त्यांचे वंशज हा वारसा सांभाळत आहेत.
सन १९१२ ला समाधिस्त झालेल्या नाना रेखींनी श्री स्वामीसुतांची अभंग गाथा स्वहस्ते लिहून जतन केली. त्यांनी केलेल्या स्वामींच्या कुंडलीने ते स्वामी समर्थ संप्रदायात कायमचे नाव कोरून आपल्याला उपकृत करून गेले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!