स्वामींची थरारक प्रचिती, जेव्हा स्वामींनी एका मृत मुलाला जिवंत केले..

मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते.

स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभवलेली माणसं हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. स्वामींच्या कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

महापूरातून स्वामींची नौका श्रीपाद पटाने वल्ली मारत पलीकडच्या किनार्‍यावर नेली. हा गावच्या चर्चेचा विषय झाला होता. स्वामी गावात आल्यावर त्यांच्या भोवती माणसे जमा झाली. लोकांनी स्वामींची पूजा केली. गावचा पाटील स्वामी समोर आला आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या होत्या आणि

ते स्वामींसमोर खूप रडले. स्वामींनी पाटलाला प्रेमाने हाक मारली.
तेव्हा पाटलाने स्वामींकडे पाहिले. स्वामी म्हणाले, “काळजी करू नकोस! काय झाले आहे? ते तु मला सांग!..” स्वामींच्या मधुवाणी आश्वासक शब्दांने पाटलांना आस वाटली. तेव्हा पाटील म्हणाले, “स्वामी माझा मुलगा हनुमंत महामारी ने खूप आजारी आहे. मरणाच्या दारात तडफडतो आहे. त्याचे प्राण

आपण वाचवले तर, वंशाचा दिवा विझणार नाही. स्वामी आपण माझ्या घरी चालावे! अशी मी विनंती करतो.” पाटलांचे दयनीय अवस्था पाहून स्वामींनी त्याची विनंती मान्य केली. आणि स्वामी पाटलांच्या घरी गेले. स्वामी घरी गेले तेव्हा घरच्या लोकांनी रडून रडून आकांत मांडला होता. स्वामी मुलांपाशी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, तो मुलगा शेवटचे आचके देत आहे. स्वामी भोवती घरची माणसे गोळा झाली आणि जोराने रडू लागली. तेव्हा

स्वामी म्हणाले, “मुलांना कोण निरोप द्यायला आला आहे ते मला सांग. मला ठाऊक आहे. काळजी करू नका. कडुलिंबाचा पाला आना!.” पाटील धावत धावत बाहेर गेले आणि त्यांनी कडुलिंबाचा पाला आणला. मुलाच्या अंगावर कडुलिंबाचा पाला लावला आणि स्वतः कडूलिंबाच्या पाल्याचा रस काढून मुलाच्या मुखात घातला. आश्चर्य घडले

मुलाने डोळे उघडले. त्यांची हालचाल सुरू झाली. मुलगा जिवंत झाला होता. पाटलांना खूप आनंद झाला. मुलगा जिवंत झाला त्या वेळेला बाहेर एक कोंबडीचे पिल्लू बोक्याने पकडले आणि ठार मारले. मृत्यू रिकामा परत गेला नव्हता. पाटील स्वामींच्या पाया पडू लागले. म्हणू लागले, “स्वामी माझ्यावर तुमचे खुप उपकार आहेत. स्वामी गावात महामारी ची सात

आली आहे. रोज पाच ते दहा माणसे मरतात. सर्वांचे प्राण वाचावेत असे मला वाटते!” स्वामींनी महामारी ची साथ नष्ट केली आणि स्वामी पुन्हा अक्कलकोटला जायला निघाले. गावातल्या लोकांनी स्वामीं चा जयजयकार केला. स्वामींनी श्रीपाद पठाण सांगितले “लठ्ट्या नौका तयार कर! आपण परत निघालो आहोत!..” स्वामी नौकेत बसले तेव्हा सारागाव नदीच्या काठावर जमा झाला होता. जर आपली भक्ती खरी

असेल तर दगडालाही पाझर फुटतो. म्हणून आपली भक्ती कधीही खरी असावी. स्वामी आपला या प्रत्येक संकटातून बाहेर काढतील ते आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ते आपल्या भक्ताला कधीही संकटामध्ये त्याला सोडत नाहीत. फक्त आपण जी भक्ति करत असतो त्यामध्ये कोणताही स्वा’र्थ नसावा. नि’स्वार्थपणे भक्ती करावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *