मित्रांनो, आजच्या लेखातून स्वामींची एक लीला आपण पाहणार आहोत, या लीलेमध्ये स्वामींनी सर्वांना सांगितले आहे की, दुःखाचे कारण काय असते, दुःख का येते?
एक व्यक्ती होता. तो अक्कलकोट येथे राहत होता. तो सकाळच्या प्रहरी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या मठात गेला. तो आपल्यासोबत अहंकाराला घेऊन गेला होता. त्याचा अहंकार हाच होता की, त्याने अक्कलकोटमध्ये एक सुंदर व सुरेख असे घर बांधले होते.
असे घर कोणीच बांधले नव्हते. ते त्या वेळचे जणू महल होते. तो मठात जाताच क्षणी स्वामी रागावून त्याला बोलले, “अरे अहंकारी चल चालता हो इथून!”
ह्यावर तो घाबरल्या सारखे नाटक करून तो तेथेच उभा राहिला. त्यावर स्वामी त्याला बोलले, “तुझ्याकडे जी जागतिक वस्तू आहे त्यावर तू खूप अास ठेवतोस. ती ठेवू नकोस. अरे ते आपले नाही त्याच्यावर कशाला एवढी आस ठेवायची.” या स्वामींच्या बोलण्याकडे त्या माणसाने दुर्लक्ष केले. व त्या मठातून बाहेर निघुन गेला.
दुसऱ्या दिवशी असा योगायोग त्याला काही दिवस अक्कलकोटातून बाहेर जावं लागलं..त्याप्रमाणे तो बाहेर गेला आणि जेव्हा तो परतला तेव्हा पाहतो तर काय, की त्याचे घर जळत होते.
त्यावेळी त्याला काय सुचेनासे झाले. काही जण त्याचे घर विझवण्याचा प्रयत्न करत होत. तर, काही जण तमाशा बघत होते. तो सर्वांना घर वाचवण्यासाठी विनवणी करू लागला. तेव्हा स्वामी तेथे आले आणि त्याला बोलले की ,
“काळजी करू नकोस काही होत नाही!” त्यावर तो बोलला, “स्वामी असे कसे! माझे घर पूर्ण जळत आहे!”
त्यावर स्वामी त्याला बोलले, “अरे काहीच दिवसांपूर्वी तुझ्या मोठ्या मुलाने या घराचा व्यवहार केला आहे.आणि ते बोलले आहेत की, या घराची किंमत चार पटीने जास्त किंमत देतो” यावर तो शांत उभा राहिला व तमाशा पाहू लागला.
नंतर त्याचा मुलगा त्याच्याजवळ आला आणि म्हणू लागला. “काय झाले आपले घर जळत आहे! विजवायचे नाही का?” त्यावर तो बोलला, “अरे तुझ्या मोठ्या भावाने याचा व्यवहार केला आहे. हे घर आता आपले नाही!” असे बोलून तो शांत उभा राहिला.
पुन्हा स्वामी त्याच्या जवळ आले आणि बोलले, “अरे मी तुला सांगायचं विसरलोच व्यवहार अजून पुर्ण झाला नाही. घराचे पैसे अजून तुझ्या मुलाला मिळालेच नाहीत. आणि घर जळलेले पाहून तो माणूस पैसे देईलच असेही नाही!”
यावर तो व्यक्ती खूपच घाबरला आणि पुन्हा आरडाओरडा करत आपले घर विझवण्याचा प्रयत्न करू लागला.
स्वामी त्या गृहस्थाची परिक्षा घेऊ लागले. स्वामी पुन्हा त्याच्याजवळ गेले आणि म्हणू लागले “अरे मी तुला सांगायचं विसरलो, या घराचा संपूर्ण व्यवहार झाला आहे आणि हा व्यवहार करणारा जो माणूस आहे तो खूप व्यवहाराचा पक्का आहे.
आपला दिलेला शब्द तो माघारी घेत नाही! मग कोणतीही परिस्थिती येऊ दे!” तो तुमचे पैसे देईलचं! असे बोलल्यावर तो गृहस्थ पुन्हा अनोळखी असल्यासारखे वागू लागला आणि शांत उभे राहून तमाशा पाहू लागला. नंतर त्याला असे कळले की, अजून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला नव्हता आणि त्याचे संपूर्ण घर जळून खाक झाले होते.
खर तर, हे घर त्याचे नव्हतेच कारण, या घराला बांधण्यासाठी त्यांनी जे काही पैसे वापरले होते ते गरीब लोकांना व्याजाने पैसे देऊन दुप्पट व्याज घेऊन गरीबांना लुबाडून पैसे मिळवले होते. त्यामुळे हे घर जळुन खाक झाले होते.
स्वामी माऊली म्हणतात, जे आपले नाही ते आपल्याला कधीच मिळत नाही. आणि ज्या गोष्टींमध्ये तुझ्या स्वभावात इतका अहंकार आला, त्यामुळे तर ते तुला कधीच मिळणार नाही. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा कधीही अहंकार करू नये, गर्व करू नये, कारण ते कधीच आपले नसते. आणि आपण सर्व ही प्रसिद्ध म्हण नक्किच ऐकून असाल की, “गर्वाचे घर खाली”
तर, स्वामी भक्तांनो, आपल्याला या लेखातून स्वामींनी दिलेला बोध लक्षात आलाच असेल, या बोधाचा आपल्या जीवनात अवश्य अवलंब करा.. ॥ श्री स्वामी समर्थ ॥
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शे’अर करायला विसरू नका.