आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांच्याबद्दल ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. एके दिवस तर चक्क मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते.
स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी असल्याचे अनुभव अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील त्याच्या कृती असेल नाहीतर त्यांची वचने असतील, ही नेहमीच समाजाला बोधप्रत ठरत असतात.
अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे. तिचे जवळच मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा देखील होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केल्या नियंत्रणात येत नव्हता.
माहूत आपापल्या परिने प्रयत्न करीत होते. मात्र, अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना भीती वाटू लागली.
एके दिवस राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवले होते . तरी हि तो सोंडेने नागरिकांवर दगड भिरकावीत असे. अखेर कंटाळून मालोजीराजे हे एकेदिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. राजे स्वामींना म्हणाले की, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे.
नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर आता अंकुश ठेवणे जणू अशक्य च झालं आहे आम्ही अनेक प्रयत्न करून थकलोत. आता मला वाटते त्याला देहान्ताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी महारांजांना केला.
निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत भक्तगण, स्थायिक लोक स्वामींना विनंती करू लागले की, स्वामी या रस्त्याने जाऊ नका. तो हत्ती मोठमोठे दगडसारखा भिरकावीत असतो. मात्र, महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जगावर चालते.
ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वत:ला सेवक म्हणत होते, ते देह-बुद्धी धरून पळून गेले. जेथे हत्तीला बांधून ठेवले होते, तेथे पोहोचेपर्यंत केवळ बाबा यादव एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा एवढेच दोन ते चार जण स्वामींसोबत थांबले.
स्वामी कंबरेवर हात ठेऊन हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्याच्याकडे बघून म्हणाले की, अरे मुर्खा, खूप माजलास काय? चढेल तो पडेल. हा बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे, अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला.
थोडक्यात आपल्या आजच्या पिढीसाठी या लीलेतून हा धडा घेत आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामींची सृष्टी एका विशिष्ट नियमानुसार चालते आणि प्रत्येकाचे जीवन याच नियमानुसार चालते.
यामध्ये आपण पेरलेली बीजे उगवतात, म्हणजे आपण जे विचार करतो, ज्या भावना आपण आपल्या मनात ठेवतो, आपल्या हृदयात कोरलेल्या विश्वास, आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात घटना घडतात आणि असेच लोक आकर्षित होतात. स्वामींचे भक्त व्हा, स्वामींचे नियम सर्वांसाठी समान आहेत.
तर बोला अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्तभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद…!
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद