एक साधू रस्त्याने चालले असतांना त्याना खूप तहान लागली.
पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागले, साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिले.पाणी पीत असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं.
एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं, त्या साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकंच मडकं वेगळ का रे बाबा ठेवलं आहेस? तेंव्हा तो म्हणाला, महाराज ते मडकं खराब आहे.
त्याला गळती लागली आहे. आणि म्हणुन कोणी ते घेत नाहीए. म्हणून वेगळं ठेवलं आहे. साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली, तो कुंभार म्हणाला महाराज अहो हव असेल तर चांगलं मडकं घेऊन जा. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?
ते म्हणाले देणार असशील तर हेच दे नाहीतर चाललो मी, नाईलाजस्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं. त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप कालपर्यंत कोणा एका कोपर्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या च्या सहवासाने, संत समागमाने देव कार्य करू लागलं.
देवाच्या सानिध्यात भक्त यायची तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्याला ही डोकं लावायचे आणि त्यांच मन प्रसन्न व्हायचं. जर एक मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल.
क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल तर आपण तर मनुष्य आहोत. मग आपण जर गुरूंच्या, संतांच्या, चांगल्या व्यक्तींच्या, सज्जनाच्या सहवासात राहू तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का ? म्हणून, संगत नेहमी चांगली असावी.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!