ती हवीशी ❤

त्या दोघांचा ब्रेक ऑफ झाला होत. त्याला नोकरी लागायला वेळ होता अजुन. पण ती थांबायला तयार नव्हती. शेवटी गेली ती त्याला सोडून. आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा. प्रेम, विश्वास, भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा. त्या गोष्टीला ३ वर्ष झाली. पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे… पण हा नेहमी टाळाटाल करायचा…. पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्याना बोलावते….तो येतो ऑफीस मधून…. सगळे बसलेलेच असतात…. सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ न करता गप बसतो…. मुलीकडे पाहायची तर ईछा नसते. पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात….बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात…

दुसर्या दिवशी भेटण्याच ठरत…. त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्याचा हाच विचार तो रात्र भर करत असतो…. दुसर्‍या दिवशी ते भेटतात… संध्याकाळचे ४ वाजले असतात….तेवढयत त्याला ऑफीस मधून फोन येतो…तसा ही त्याला तिला नकार द्याचा असतो…बोलायची पण इच्छा नसते… म्हणून तो तिला बोलतो…मला ऑफीस मधे जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का…? “

ती”ठीक आहे”दोघेही टॅक्सीत बसतात… पूर्ण वेळ शांतच…. कोणीच काहीच बोलत नाही….ऑफीस येत….ते बिल्डिंग पाशी येतात… तो तिला म्हणतो वर चल…पण ती म्हणते उगीच ऑफीस मधले गैर समज करतील मी थांबते खाली तू ए जाऊन…” आणि तो जातो….

तो ऑफीस मधेजातो.. काम करत असतो…. त्याचे साहेब त्याला बोलावतात…आणि त्याला प्रमोशनच लेटर देतात… आणि बाहेर देशात जाण्याची संधी पण असते….. तो खूपच खुश होतो…
पण त्याचे साहेब बोलतात… की तुला आताच्या आता मला एक प्रेज़ेंटेशन तयार करून द्यावा लागेल…. मला लवकरात लवकर त्याना सेंड करायचा आहे… तो तयार होतो.. आणि लागतो कामाला….

ती खाली वाट बघत आहे हे विसरुनच जातो तो…. ६ वाजतात.. नंतर ७…८…८.३०….फाइनली त्याचा प्रेज़ेंटेशन तयार होत…
तो जातो साहेबाना द्यायला… ते पण खुश होतात…. साहेब”जा आता घरी जा आणि घरच्यानापण आनादाची बातमी दे…. ते ही वाट बघत असतील ना…..” त्याला अचानक आठवत… तो तिला खालीच सोडून आला होता… आणि या प्रेज़ेंटेशन मुळे विसरूनच गेला होता…. ती गेली असेल निघून असाही त्याला वाटत पण जर थांबली असेल तर…

तो लगेच निघतो तिथून… मन खूपच अस्वस्थ असता त्याचा…
तो गेट बाहेर येतो… पाहतो तर काय… ती असते एका आडोशयाला उभी…. त्याला काय बोलावा सुचतच नाही…
तो”सॉरी ग…मी विसरुनच गेलो होतो… मला वाटल तू गेली असशिल…तू गेली का नाहीस…? मला फोन तर करायचा ना…..”
ती “अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून….
मला वाटल येशील लगेच… आणि फोन करायला…तुझा नंबर आहे का माज्या कडे…

मनात आला तुझ्या घरी तुज्या बाबाना विचारावा नंबर… पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर…आणि माज्या घरच्याना विचारला असत तर त्याचा पण तुज्याविषयी गैर समज झाला, असता…
वरती याव वाटल पण परत ऑफीस मधे तुला डिस्टर्ब होएल म्हणून…नाही आले….आणि तू बोलला होतास ना येतो…मग ….”

तिला काय बोलावा हेच समजत नाही त्याला…. पण तीच मन आवडल त्याला… तो”मला आवडली तू.” ती”अरे पण अस आचनक… आपण अजुन काही बोललो पण नाही… तू ओळखतही नाही मला अजुन नीट… लगेच अस ठरवायच कारण..?”

तो”हो…. कारण आहे…. पण मला एक सांगायच आहे तुला…..
मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो… ती ही करत होती….
पण लग्नासाठी ती तयार नव्हती… तिला माज्या प्रेमा सोबत… माझे पैसे… नाव… प्रसिधी… हेही हव होत… पण तेव्हा माज्या कडे काहीच नव्हत… मी तिला थोडा वेळ मागितला… पण तोही ती द्यायला तयार नव्हती…शेवटी गेली ती सोडून मला….

त्यानंतर माझ प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागला…. म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो… तुलाही नकार द्याचा हेच ठरवल होत मी… खूप आधीच… पण आज जे झाल…
त्याने माझे डोळे उघडले… जिच्यावर मी एतका प्रेम करत होतो…
तीने मला कधी वेळ दिलाच नाही…आणि आज माज्या फक्त एका शब्दावर…. तू एतका वेळ थांबलिस…

आणि मी विसरलो होतो हे एइकूणसुधा तू मला समजून घेतलास एतका….कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात….
पण मला तुझा स्वभावच आवडला…. ते पुरेस आहे आपल्या संसारसाठी…. हो ना….”

“जर तुलाही मी आवडलो असेल तर….सांग?” ती हळूच नजर खाली घेते… त्याला तिच उत्तर समजत…. तो आई ला फोन करतो…. आणि बोलतो… “मला मुलगी पसंत आहे”

मित्रांनो… लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच…
पण त्यापेक्ष्याही…एकमेकना समजून घेणा… गरजेच असत….?

”आठवण माझी आली कधी,तर पापण्या जरा मीटून बघ, सरलेल्या क्षणांमधले संवाद जरा आठवून बघ..
 
आठवण माझी आली कधी तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ, त्या पाउल वाटेवरती उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी, तर उडणार्या पक्षांकडे बघ..
त्यांच्यासारखाच माझ मन, तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी तर चांदण्या जरा मोजून बघ, चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा शब्द न शब्द आठवून बघ..

आठवण माझी आली कधी तर सागरकिनारी जाऊन बघ.. हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा परतणाऱ्या नीराश  लाटेच वीरघळन बघ…

आठवण माझी आली कधी तर साद मला घालून बघ, तुझ्या अवतीभोवती फीरणार माझ अस्तित्व जरा जाणवून बघ..

खूप काही नकोय मला ना कुठलं वचन…ना कुठलं आश्वासन फक्त हवी आहे तुझी साथ, तुझा हात माझ्या हातात.. खूप काही नकोय मला नको तो चंद्र … नको ते तारे फक्त हावेत तुझे श्वास माझ्या श्वासात दरवळणारे..

खूप काही नकोय मला नको सोन्याचा कळस… नको रत्नांच्या राशी फक्त हवं एक सोनेरी आंगण आणि गोजिरवाणी तुळस दारा पाशी… खूप काही नकोय मला..साथ तुझी हवी आहे.. डोळ्यातून कोसळणार्या पाउसाला, हक्काची एक जमीन हवी आहे.. खरंच खूप काही नकोय मला, फक्त तू हवी आहेस…फक्त तू हवी आहेस

एक प्रियकर…M.Jare…..♥
         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *