भारतीय संस्कृतीत परंपरा, चालिरिती यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज अगदी न चुकता नियमितपणे घरात आपले आराध्य कुलदेवता, कुलदेवी यांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी तर शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवांची पूजा केली जाते.
तर काही ठिकाणी कौटुंबिक परंपरा, मान्यता यांनुसार पूजा केली जाते. भगवंतांचे नामस्मरण, पूजन अत्यंत शुभ मानले गेले आहे. मानसिक शांतता, प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन, नामस्मरण उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आराध्य देवता, कुलदैवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. देवतांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा, चालिरिती, विधी, ष़डोपचार, धार्मिक विधी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज अगदी न चुकता नियमितपणे घरात आपले आराध्य कुलदेवता, कुलदेवी यांचे पूजन केले जाते.
यामध्ये तिन्हीसांजेला करण्यात येणाऱ्या पूजनावेळी काही नियम वा संकेत पाळणे अतिशय आवश्यक असते. तरच आपण करत असलेल्या कर्माचे उत्तम फळ प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. अनेकांना या संदर्भात योग माहिती नसते आणि हातून अनावधानाने चुका घडतात. तिन्हीसांजेला किंवा रात्री पूजा करताना नेमक्या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊयात..
दिवसभरात केलेल्या देवतांच्या पूजन तथा नामस्मरणामुळे शुभ फल प्राप्त होते तसेच समाधानाची अनुभूती खपण घेऊ शकतो, असे पुराणात सांगण्यात आले आहे. सकाळी देवतांचे यथाशक्ती, यथासंभव पूजन आणि तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावणे, धूप घालणे असा पिढ्यान् पिढ्यांचा नित्यनेम सुरू असतो.
काही पूजा किंवा व्रत-वैकल्ये तिन्हीसांजेला केली जातात. तिन्हीसांजेला करण्यात येणाऱ्या पूजनावेळी काही नियम वा संकेत पाळणे आवश्यक असते. तरच आपण करत असलेल्या कर्माचे उत्तम फळ प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. अनेकांना यासंदर्भात योग माहिती नसते आणि हातून अनावधानाने चुका घडतात. तिन्हीसांजेला किंवा रात्री पूजा करताना नेमक्या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊयात.
शंखनाद – अनेक ठिकाणी सकाळी देवाची पूजा करताना शंखनाद करण्याची पद्धत आहे. मात्र, पुराणातील काही उल्लेखांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्री पूजा करताना शंखनाद करू नये, असे सांगितले जाते. कारण सूर्यास्तानंतर देवी-देवता विश्राम करायला जातात, अशी मान्यता आहे.
त्यामुळे तिन्हीसांजेला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देवतांच्या साधनेत व्यत्यय येऊ शकतो. तसेच वायुमंडळात अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म जीवांनाचा विश्राम बाधित होतो. असे केल्याने पूजनाचा लाभ मिळत नाही, उलट नुकसान सोसावे लागू शकते. मनोभावे केलेल्या पूजनाला अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे शंखनाद करू नये, असे सांगितले जाते.
घंटानाद – घंटानाद केल्याने एक प्रकारची सकारात्मकता, चैतन्य, उत्साह संचारतो, अशी मान्यता आहे. अनेक घरांमध्येही काहीशा मोठा घंटा पाहायला मिळतात. सकाळी केल्या जाणाऱ्या देवपूजनावेळी आवर्जुन घंटानाद केला जातो. काही ठिकाणी छोट्या स्वरुपातील घंटा असतात. अनेक ठिकाणी दररोजच्या पूजनात घंटिका देवीचे पूजनही केले जाते.
मात्र, पुराणातील काही मान्यतांनुसार, तिन्हीसांजेच्या पूजनावेळी किंवा देवासमोर दिवा लावताना घंटानाद करू नये, असे सांगितले जाते. घंटानाद केल्याने वायुमंडळातील सूक्ष्म जीवांच्या विश्रामात बाधा येते, अशी मान्यता असल्याने सूर्यास्तानंतर घंटानाद करणे शक्यतो टाळावे, असे सांगितले जाते.
तिन्हीसांजेला कोणाचे पूजन करावे?- पुराणांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्रीच्या वेळी सूर्यपंचदेवतांचे पूजन करणे वर्ज्य मानले गेले आहे. सूर्यपंचायत देवतांमध्ये सूर्य, गणपती, दुर्गा, शिव आणि विष्णू यांचा समावेश आहे. तिन्हीसांजेला सदर सूर्यापंचदेवतांचे पूजन करू नये, असे मानले जाते.
याशिवाय गणपती इत्यादी देवतांचे पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. तिन्हीसांजेला किंवा रात्री यांचे पूजन करणे शुभ लाभदायक ठरते. तसेच या देवतांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. तर दुसरीकडे तिन्हीसांजेला किंवा रात्री सूर्यपंचदेवतांचे पूजन केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे सांगितले जाते.
तुळस – श्रीविष्णूंसह अन्य देवतांच्या पूजनात तुळशीच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. मात्र, सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. एवढेच नव्हे, तर तुळशीच्या पानांना स्पर्शही करू नये, असे म्हटले जाते. शास्त्रांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्री तुळशीची पाने तोडणे किंवा त्यांना स्पर्श करणे वर्ज्य मानले गेले आहे. असे केल्यास आर्थिक आघाडीवर चिंता वाढू शकते. समस्या उद्भवू शकतात तसेच नकारात्मकता वाढू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
तिन्हीसांजेच्या पूजा विधी मध्ये दिशा महत्त्वाची – पुराण आणि शास्त्रांनुसार, तिन्हीसांजेला किंवा रात्रीच्या वेळी पूजा करताना उत्तरेकडे मुख असावे, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रातही उत्तर दिशेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून केलेले पूजन पुण्यफलदायी ठरते.
तसेच महादेव शिवशंकराच्या पूजनात उत्तर दिशेला अधिक महत्त्व आहे, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. उत्तरेकडे तोंड करून केलेल्या पूजनामुळे धन, धान्य, सुख, संपत्ती वृद्धिंगत होते. उत्तर दिशा स्थिरतेचे सूचक आहे. कुबेराची कृपादृष्टी या दिशेवर अधिक असते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!