तोचि एक समर्थ.. स्वामी सेवेत या.. आपल्या समस्या निश्चितच दूर होतील…

स्वामीभक्तहो आपली कोणतीही समस्या असूद्या बघा ती स्वामी कशाप्रकारे दूर करतात. स्वामींच्या याच लीलांमधून आपल्याला कळून येईल की स्वामी आपल्यावर कशाप्रकारे अनुग्रह करीत असतात. चला तर यांच्या गोड लीलेमधून स्वामी आपल्यावर कशी कृपा करतात ते बघुया.स्वामी महाराजांची स्वारी इडगी नावाच्या गावात मारुतीच्या मंदिरामध्ये होती. चार वाजयची वेळ होती. स्वामी महाराज निजलेले होते.

सोबत चाळीस पन्नास सेवेकरी जमलेली होती. तोच तेथे एक प्रकार घडतो. रावन्ना नावाचा एक शेतकरी शेतात काम करत असताना त्याला नावाचा दंश होतो.त्याच्या तोंडात फेस येतो आणि सर्व विष शरीरात पसरून तो जागेवर गतप्राण होतो. तरीही तेथील शेतातील काही मंडळी त्याला घेऊन मारुतीच्या मंदिरात स्वामींच्या समोर आणून ठेवतात. स्वामी नीजलेले होते म्हणून कोणालाही स्वामींना उठवण्याची हिम्मत झाली नाही. पण रावन्नाचे की करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता.

त्यातच तेथे बाबासाहेब जाधव म्हणून स्वामींचे सेवेकरी त्यांनी एक हिम्मत केली. त्यांनी स्वामींचे जोड उचलली आणि रावन्नाच्या मस्तकावर ठेवले. जोड मस्तकावर ठेवताच त्याचवेळी स्वामी ताडकन उठून उभे राहिले. स्वामींचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. स्वामींचा चिडलेला चेहरा पाहून आता बाबासाहेबांचे काही खरे नाही..

असं समजून सोबत असलेले चाळीस पन्नास सेवेकरी तेथून पळूनच गेले. परंतु दोन तीन सेवेकरी तेथे थांबले. स्वामींनी रागाच्या भरात त्यांच्या अंगावरील कपडे फेकून दिले आणि बाबासाहेबांना शिव्या देत बोलले, अरे गाढवा, ‘अरे मुर्खा तुला त्या मुडद्याच्या डोक्यावर माझा जोड ठेवायला कोणी सांगितला होता? उचल तो जोडा.

बाबासाहेबांची सर्वांगाची कापरे सुरू झाली. त्यांची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आलीच असेल तुम्हाला. असो. स्वामी ही आई आहे. खरी लीला तर अजून सुरू होणार होती. बाबासाहेब जाधवांनी स्वामींचा जोडा रावन्नाच्या मस्तक वरून उचलला. स्वामी पुन्हा चिडलेल्या आवाजात ओरडले अरे त्याच्या कानात त्याचे नाव घे.बाबासाहेब परत घाबरले आणि त्यांनी घाबरतच रावन्नाच्या कानात आवाज दिला.

“रावन्ना” तेव्हा स्वामी पुन्हा बोलले, अरे गाढवा मोठ्याने आवाज दे. बाबासाहेब मोठ्याने बोलले “रावन्ना” आता मात्र स्वामींचा आवाज चढला आणि स्वामी अतिशय रागात बोलले अरे गाढवा तुला समजत नाही का अजून मोठ्याने आवाज दे त्याला.

मग मात्र बाबासाहेब जाधव मोठ्याने बोलले ”रावन्ना” ”रावन्ना” बाबासाहेबांनी मोठ्याने आवाज देता चमत्कार घडला रावन्ना ताडकन उठून उभा राहिला. नागाच्या दंशाने गतप्राण झालेला ”रावन्ना” उठून उभा राहिला.एका मूडद्याच्या शरीरात प्राण येऊन तो उठून उभा राहिला. सर्वांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू सुरू झाले.

स्वामी आई आहे. तिला आपल्या भक्तांची काळजी आहे. ती कधीच कोणाला रागवत नाही. तिच्या रागवण्यात कल्याणच असतं. तिची आता सर्वांना प्रचिती आली. सर्वांनी स्वामी नामाचा एकच घोषात जयजयकार केला. बोला “अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल, भक्ताभिमान अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय”.

स्वामींच्या लीलांची अनेक बोध आहेत. यापैकी या आताच्या या लिलेमधून या लीलेच चिंतन केले असता ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी स्वामींची परवानगी न घेता स्वामींचा जोडा त्याच्या डोक्यावर ठेवला आणि यामुळे त्यांच्यावर चिडले आणि जोड कोणी ठेवायला सांगितला असा जाब विचारला.यातून बाबासाहेबासह तुम्हां आम्हां सर्वांना बोध देत सांगितले आहे

की माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे.प्रत्येक व्याकि माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार केले आहे. योग्यवेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे.

बघा, स्वामींच्या हुकुमाने बाबासाहेबांनी जोड उचलले आणि त्याएवजी रावन्नाच्या कानात फक्त त्याचे नाव घेतले तेव्हा चमत्कार झाला. नागाच्या दांशाने मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत झाला. म्हणून जी कोणी व्यक्ती स्वामींच्या दरबारात येईल, याची आणि स्वामींची अनन्य नाती आहेत. तो स्वामींच्या इच्छेने आलेला आहे.

स्वामींनीच त्याला बोलवले आहे. ही समज देऊन त्याला इतर गोष्टी सांगत बसण्यापेक्षा त्यातील अनन्य भक्ती वाढवण्यास निमित्त बनायचे आहे. स्वामींनी दिलेला बोध त्याचे गुणगान करत श्रद्धा रूढ करण्यास निमित्त बनायचे आहे. बघा त्याच्या भक्तीच्या श्रध्देने नक्कीच स्वामींनी त्याच्यासाठी जे उत्तर निर्माण केले आहे ते त्यास भेटेल आणि तो समस्यामुक्त होईल.चला तर मग आज आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद करुया, हे मना, लक्षात ठेव जो कोणी स्वामींच्या दरबारात येतो ना तो स्वामींच्या इच्छेनेच येतो.

आज त्याची कसलीही समस्या असुदे त्याचा प्रत्येक समस्येचे उत्तर स्वामींनी तयार केलेले आहे. त्याला फक्त त्याच्यातील अनन्य भक्ती आणि अवैद्य श्रद्धा वाढवण्यासाठी निमित्त बनायचे आहे.स्वामी आपल्याला निश्चितच तारक असतात.

त्यांच्या कुपादृष्टी प्राप्त होताच आपली प्रत्येक समस्या दूर होणारच. आपल्याला गरज आहे ती स्वांमिवरती विश्वास ठेऊन श्रद्धापूर्वक त्यांची पूजा करायची, त्यांच्याप्रती संपूर्ण जीवन समर्पित करायचं आहे. निश्चितच तुम्हाला बघा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तर तर स्वामींचा प्रेमपूर्वक जयघोष करुया.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *