तूळ राशीतील क्रूर त्रिग्रही योग काही राशींना काहीसा प्रतिकूल ठरू शकतो, असे सांगितले जात आहे…

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असतात. ग्रहांच्या राशी गोचरामुळे काही योग जुळून येतात. यातील काही योग शुभ असतात, तर काही योग प्रतिकूल परिणामकारक ठरतात. आताच्या घडीला तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतु विराजमान आहेत.

तूळ राशीत हे चार ग्रह असताना काही योग जुळून येत आहेत. सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य, मंगळ आणि केतु यांचा युती योग, सूर्य, बुध, मंगळ आणि केतु यांचा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. यातच सूर्य, मंगळ आणि केतु यांचा क्रूर योग जुळून येत आहे. क्रूर त्रिग्रही योग हा फारसा अनुकूल मानला जात नाही. त्याचा प्रतिकूल प्रभाव अधिक पाहायला मिळतो, असे म्हटले जाते.

तूळ ही सूर्याची नीच रास मानली जाते. यामध्ये सूर्य कमकुवत मानला जातो. क्रूर त्रिग्रही योग काही राशींसाठी चढ-उताराचा असू शकतो. काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. क्रूर त्रिग्रही योगामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्या राशींनी नेमके काय करू नये? जाणून घेऊया…

मेष राशीच्या व्यक्तींना क्रूर त्रिग्रही योग मध्यम फलदायी ठरणार आहे. नोकरदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्दयावरून वाद होऊ शकतो. कोणाशीही पैशाचा मोठा व्यवहार टाळावा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात फारसे मन लागू शकत नाहीत. व्यवसायिकांनी या काळात कोणालाही उधार देणे टाळावे. मोठी गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो.

वृषभ राशीच्या व्यक्तींना क्रूर त्रिग्रही योग संमिश्र परिणाम देणार आहे. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. जोडीदारासोबत काही मुद्दयावरून वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची काळजी घ्या. धावपळ करावी लागू शकते. काही सरकारी कामामुळे त्रास होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना क्रूर त्रिग्रही योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. या काळात कुठेही मोठी गुंतवणूक करणे टाळा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदारांचा अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. वडिलांशी काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. काही कामे रखडतील. मुलांच्या काही कामामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना क्रूर त्रिग्रही योग काहीसा संमिश्र ठरू शकेल. कोणत्याही प्रकारचे वाद टाळावे लागतील. शांत राहावे लागेल. बोलण्याने कोणाचेही नुकसान होणार नाही यावर लक्ष ठेवा. मुलांच्या वागणुकीमुळे समस्या उद्भवू शकतात. एकांतात राहणे पसंत कराल. कौटुंबिक सदस्यांमध्ये काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो. नाराज राहाल. धार्मिक कार्य केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल.

मकर राशीच्या व्यक्तींना क्रूर त्रिग्रही योगात खूप सावधगिरी बाळगणे आणि आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कौटुंबिक स्तरावर सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही अनैतिक कृत्यांपासून दूर राहा. अन्यथा समाजातील तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. नोकरदारांना सहकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. महत्त्वाचे काम काही कारणाने अडकू शकते. घाईघाईने कोणतेही काम करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यंदा कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *