प्रत्येक हिंदू धर्मीयांचा घराजवळ किंवा घरामध्ये तुळशीचे रोप असायला हवे. कारण तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व ती ऊर्जा आपले भाग्य, आपले नशीब बनवत असते. आपल्या घरावर कोणतेही संकट येणार असेल तर ते संकट ती तुळशी आपल्यावर घेत असते.
तुळशीचे खूप मोठे महत्व आहे. ज्योतिष शास्त्र असुद्या, वास्तुशास्त्र असुद्या किंवा अन्य कोणतेही शास्त्र असूद्य, प्रत्येक शास्त्रामध्ये तुळशी चे वर्णन आलेले असते. घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे आवश्यक असते. आणि माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्याचे काम ही तुळस करत असते. मात्र या तुळशीच्या वृंदावना जवळ या वस्तू चुकूनही ठेवू नका.मित्रांनो, नाहीतर घरात येईल गरिबी, घर होईल बरबाद, वंश होईल नष्ट, माता लक्ष्मी रुसून घर सोडून जाईल.
या जर वस्तू तुळशी जवळ ठेवल्यास त्या घरात तुळशीचे वास्तव राहत नाही. त्याच बरोबर माता लक्ष्मीचे ही वास्तव राहत नाही. त्यामुळे घरात दारिद्र्य अवस्था प्राप्त होते. त्यामुळे या वस्तूंची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या वस्तू कोणत्या? ते आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
पहिली वस्तू जी आहे गणपतीची मूर्ती किंवा गणपती चा फोटो हा तुळशीजवळ किंवा तुळशीमध्ये ठेवू नका. गणपती बाप्पाने तुळशी मातेला श्राप दिला होता की, तु माझ्याजवळ कधीही येऊ शकणार नाहीस. म्हणून गणपती व तुळशी एकमेकांपासून दूर ठेवायला हवी. नाहीतर त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
दुसरी वस्तू म्हणजे शिवलिंग बऱ्याच जणांच्या तुळशी वृंदावन फाशी शिवलिंग असते. त्यांना असे वाटते की, त्याचा आपल्याला फायदा होईल. घरासाठी ते खूप शुभकारक असते. मात्र हे लक्षात ठेवा की कधीही चुकूनही कोणत्याही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका. तुम्ही ऐकला असाल की शिवलिंग तुळशीत ठेवले जाते परंतु ते शिवलिंग नसते तो शालिग्राम असतो. शालिग्राम व शिवलिंग हे दिसायला एक सारखे असते.
शालिग्राम हे श्री विष्णूचे रूप आहे. आणि आपल्याला माहिती असेल की, तुळशी विष्णुप्रिय आहे. भगवान विष्णूंना तुळस या अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण तुळशीत शालिग्राम ची स्थापना करा. तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. मात्र शिवलिंग ठेवू नका त्याने नकारात्मक परिणाम आपल्या घरावर येतील.
मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरातील कचरा. बऱ्याचदा आपण घरातील कचरा काढून तो तुळशी वृंदावन उपाशी ठेवतो. नंतर तेथून काढून तो बाहेर टाकतो असे हे कधीही करू नये. तुळशी जवळ कधीही कचरा करू नका. तसेच तुळशी जवळची जागा जितकी होईल तितकी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. बराच वेळ आपण पाहिलेला असतो की तुळशीची काळजी घेऊन देखील ते तुळशीचे रोप वाळते. याचे कारण असे की, त्या रोपमधून माता तुळशी निघून गेलेली असते. त्यामुळे ते सुकू लागते.
चौथी गोष्ट म्हणजे कधीही तुळशीच्या जवळ कपडे सुकायला घालू नका. यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पाचवी गोष्ट म्हणजे काळा रंगाच्या कोणताही वस्तू तुळशी कशी ठेवू नयेत. असे की, काळे उडीद, काळे कपडे, काळे तीळ अशा कोणत्याही प्रकारचा काळा रंगाच्या वस्तू या तुळशी जवळ ठेवू नयेत. कारण काळा रंग हा अशुभ तेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ शकतो. म्हणून अशा वस्तू तुळशी जवळ अजिबात ठेवू नये.
सहावी गोष्ट म्हणजे कधीही तुळशीजवळ चपला काढू नयेत. आपण बाहेरून कुठून दरी आलो तर, आपण तुळशीजवळ काढत असतो. माता लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते व आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याची शक्यता असते. म्हणून कधीही तुळशीजवळ चपला काढू नयेत.
सातवी गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी. मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवा कि पाण्याची टाकी व तुळस यामध्ये कमीत कमी चार ते पाच हात अंतर असावे. किंवा या टॉकीज ची सावली देखील आपल्या तुळशी वर पडू देऊ नका. यामुळे देखील नकारात्मकता निर्माण होते.
अशा प्रकारे या 7 गोष्टी तुळशी जवळ अजिबात असू नयेत. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन आपल्या घरात देखील नकारात्मक ऊर्जा वाढते. व घरातील सुख समृद्धी निघून जाते. घरातील लक्ष्मी ही नाहीशी होते. मग घरात नकारात्मक दृष्टीत वाढ होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!