दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रिण. कॉलेज पासून दोघेही एकत्र…. मग नकळतच मैत्रीच रुपांतर प्रेमात झाल… आवडत तर होते पण स्वताहून बोलायला कोणी तयार नाही.. त्याला वाटायच तिला आपल्या मनातल समजल तर ती असलेली मैत्री सुधा तोडून टाकेल….. आणि तिला वाटायच की मी स्वताहून विचारला तर तो म्हणेल की आज कालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत… गैरसमज होइल….. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते… पण बोलायला तयार नाही…
एकदा तिने तिच्या मैत्रिनिला सहज कॉल केला… ती हॉस्पिटल मधे एड्मिट आहे… असा तिला समजल ती लगेच तिला भेटायला गेली… रूम च्या आत जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला.. पण तरीही ती गेली तिच्या पाशी व विचारपूस करू लागली…..
तेव्हा तिला समजले की तिच्या मैत्रिनिला कॅन्सर झाला होता…. ती काही दिवसच जगणार होती.. दोघीही रडत होत्या… नंतर मग… थोड्या वेळाने तिने तिला त्या माणसा विषयी विचारल… कोण…? तो…? कुठला… मी कधी याला पहिल नाही… ती उदास नजरेने त्याच्या कडे पाहते…. आणि बोलते हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स.. एकत्र…लहानाचे मोठे झालो….नंतर घर बदलल… जॉब वेगळा….सगळा वेगळा झाला पण मैत्री तशीच होती…
आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचो पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही.. दोघेही घाबरायचो…. पण नंतर आमच्यातला दुरावा वाढतच गेला… पण एकदा मी ठरवल की आज त्याला सगळा सांगून टाकायच… तेव्हा मी त्याच्या घरी गेले… पण तिथे समजला की त्याच लग्न ठरला आहे…. मग मी स्वतः हुनच काही सांगितल नाही… वेळ लागला पण सावरल मी स्वताला..
निदान तो, त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होती… आज मी त्याला हे सत्य सांगितल तर बोलला की तोही माज्यावर प्रेम करत होता.. पण बोलला नाही… आणि आज बोलला तर आयुष्यच उरला नाही माज्याकडे… अस वाटत की त्या वेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारल असत.. तर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते…
आज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत… आमच्यासाठी… हे सर्व एकूण ती खूप टेन्शन मधे येते… ती लगेच तिच्या त्या मित्राला फोन करते… भेटायला बोलावते….तो येतो….ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते… “तुझ माहीत नाही मला…. पण मी खूप प्रेम करते तुज्यावर ” तो सुधा मग थोडा हसतो आणि म्हणतो “मी पण”.
मित्रांनो आयुष्यात अस काहीच करू नका… की पुढे जाऊन तुम्हाला वाटेल… कदाचित हे केल असता तर… अस बोलला असत तर… अस करायला हव होत. .. कारण जेव्हा तुम्हाला अस वाटेल तेव्हा कदाचित तुमच्या कडे वेळच नसेल…. उद्या कधीच येत नाही… नेहमी येतो तो आज… म्हणून आजच्या दिवसातच मनसोक्त जगा….🤗