उन्हाळ्यात गारेगार उसाचा रस पीत असाल तर, ही माहिती जरूर वाचा.

उन्हाळा आला की, अनेकजण थंड होण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी उसाच्या रसाला प्राधान्य देतात. उसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही, तर अनेक आजारांनाही दूर ठेवतो.

उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा मिळते. तसंच ऊस शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते. उसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दातांच्या समस्याही कमी होतात.

यंत्राने काढलेला रस : यंत्राने रस काढल्यास त्याचे बुड व शेंडा एकाच वेळी वापरला जातो व त्यामुळे सर्व गुणधर्म बदलतात. हा रस पचनास अत्यंत जड, आम्ल,विदाही (छातीत जळजळ निर्माण करणारा), बद्धकोष्टता निर्माण करणारा असतो. ही झाली आयुर्वेदीक बाजु पीक म्हणुन ऊसाचा विचार करता १० व्या महिन्यात हा परिपक्व होतो. १० ते १५ महीन्यापर्यंत तो सकस असतो.

पारंपरिक दृष्ट्या डिसेंबर ते फेबृवारी या काळात हे पीक येते. व हा हिवाळ्याचा काळ असल्याने ऊसाचा रस अत्यंत लाभदायी ठरतो. नॅचरल डीटॉक्स म्हणुन ऊपयुक्त ठरतो. मात्र यंत्राने केलेल्या रसाचे गुणधर्म आपण जाणतोच. त्यामुळे रस ताजा,व योग्य पद्धतीने बनवलेला असेल तसेच दुपारीच तो योग्य ठरतो. कफप्रकृतीच्या व्यक्ती, लठ्ठ, मधुमेही व्यक्तींनी, तसेच रात्री ऊसाचा रस पिऊ नये. ऊसाचा रस २ ग्लासच्यावर पिऊ नये. पुदीना व अद्रक टाकुन घेतल्यास सुपाच्य ठरतो.

उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी पोषक तत्वे असतात. म्हणून उसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दातांच्या समस्याही कमी होतात. पण तरीही उसाच्या रसाचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो.

अशाप्रकारे आयुर्वेदाने हिवाळ्यात बलवर्धक, Natural detox करणारा, पचनास मदत करणारा असतो. कारण हा ॠतु देखील आयुर्वेदानुसार “आदानकाल” मानला जातो.

या काळात शरीराची शक्ती वाढते व ऊन्हाळ्यात” तर्पन” (Hydrartion) हे कर्म सांगितले आहे. कारण हा” विसर्गकाल“ आहे. व या काळात शरीराची नैसर्गिकरित्या झीज होत असते. त्यामुळे शरीराचे तापमान नियमीत ठेवणे हाच ऊपयोग ऊसाच्या रसाचा होतो.

उसाचा रस पिण्याचे तोटे – तुमची ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असेल तर ऊसाच्या रसाचे सेवन करू नये. यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

उसाच्या रसात मोठय़ा प्रमाणात कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे जे वजन कमी करताहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.

जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर उसाचा रस दूरच ठेवावा. यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

उसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये. तसंच उसाच्या रसात पाणी टाकू नये. त्यानं ऊसाच्या रसाचे गुणधर्म कमी होऊ शकते. बर्फही कमीच वापरावा.

दिवसातून केवळ दोन ग्लासच ऊसाचा रस प्यावा, त्यापेक्षा अधिक रस एका दिवसात घेतला तर त्यामुळे नुकसान होऊ शकते. जॉइन्डिस असल्यास तुम्ही अधिक प्रमाणात रस पिऊ शकता.

फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळावं, कारण फ्रिज केलेला उसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळा. यामुळे कफाचा त्रास वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *