मित्रांनो यंदाच्या वर्षातील म्हणजे 2022 मधील पहिला ग्रहण काही दिवसांनंतर आहे. 30 एप्रिल रोजी पहिलं सूर्यग्रहण दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार आंशिक सूर्यग्रहण झाल्यानंतरही त्याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण प्रशांत महासागर इत्यादी ठिकाणी दिसणार आहे.
२०२२ या वर्षात दोन सूर्यग्रहण होणार आहेत. ३० एप्रिलच्या मध्यरात्री वर्षातलं पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल. हे ग्रहण मध्यरात्री १२.१५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत चालेल. ग्रहण मेष राशीत होणार आहे. वैदिक पंचांगा नुसार हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक काळ मानला जाणार नाही.
हे ग्रहण दक्षिण अमेरिकेचा नैऋत्य भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. त्यामुळे या ग्रहणाचा काही ना काही प्रभाव सर्व राशींवर नक्कीच दिसून येईल. पण काही राशींसाठी हे ग्रहण शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार राशी.
वृषभ – हे ग्रहण तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते. या ग्रहणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकले ली कामं पूर्ण करता येतील. व्यवसायात भाग्य तुम्हाला साथ देईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. संततीकडून काही शुभ माहिती मिळू शकते.
कर्क – मित्रांनो या नवीन वर्षामधील सर्वात पहिले हे ग्रहण तुमच्या राशीसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची प्रतिमा चांगली होईल. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळू शकतात
धनु – या सूर्यग्रह णाच्या प्रभावाने तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. आणि या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि प्रगतीचे नवीन मार्गही खुले होतील. तसेच, व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
तूळ – मित्रांनो सूर्यग्रहण तुमच्या राशीसाठी खूप शुभ असणार आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो या राशीच्या लोकांसाठी व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला पैसे मिळू शकतात.
वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शे’अर करायला विसरू नका.