आजचे राशीभविष्य: 5 फेब्रुवारी 2022, वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर, विद्येची देवी माता सरस्वती यांचे या 4 राशींवर असतील कृपा आर्शीवाद.

मित्रांनो या वसंत पंचमीच्या दिवशी शुभ संयोग बनत आहेत आणि त्यामुळे त्याचा चांगला परिणाम काही राशींवर होणार आहे. वसंत पंचमी पासून राशींच्या लोकांचे बाकी बदलणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या नष्ट होऊन त्यांचे जीवन अगदी आनंदाने फुलून निघणार आहे. त्याचबरोबर या राशिच्या लोकांचे जीवनामध्ये आता सकारात्मक बदल घडून येणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये असलेले दुःख, नैराश्य, मानसिक ताणतणाव या सर्व समस्यापासून त्यांची सुटका होऊन त्यांच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळणार आहे.

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला वसंत पंचमी म्हणतात. यंदा वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती पूजा शनिवारी, ५ फेब्रुवारीला आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये वसंत पंचमीला वागेश्वरी जयंती आणि सरस्वती जयंती असेही म्हणतात. रंग गुलाल उत्सवाची सुरुवात वसंत पंचमीच्या दिवसापासून होते कारण या दिवशी सर्वप्रथम देवी सरस्वतीला गुलाल अर्पण करून वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. मित्रांनो या काळामध्ये बुद्ध आणि सूर्य हे मकर राशि मध्ये राहणार आहेत त्यामुळे काही खास राशींच्या लोकांवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे.

वसंत पंचमीचा आरंभ ५ फेब्रुवारी, शनिवारी पहाटे, ३ वाजून ४८ मिनिटांला होईल. वसंत पंचमीची समाप्ती ६ फेब्रुवारी, रविवारी पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांला होईल.

चला तर मग जाणून घेऊया या वसंत पंचमीपासून कोणकोणत्या राशींचे भाग्य बदलणार आहे आणि यामुळे या राशीचे लोक राजासारखे जीवन जगणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल कोणते बदल घडून येणार आहेत ते.

मेष रास – मित्रांनो या वसंत पंचमी पासून तुम्हाला नशिबाची साथ मिळण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. मित्रांनो वसंत पंचमीला तुम्हाला पांढऱ्या वस्तू दान करायची आहे. या वसंत पंचमी पासून मेष राशीचे लोक कामकाजात चांगले प्रदर्शन करतील आणि इतर लोकांवरही त्यांचा प्रभाव पडेल. तुम्ही तुमच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सुखकर असेल. पोटाचा त्रास होऊ शकतो. आहारात थोडी काळजी घ्या, अन्यथा वायूचे विकार होऊ शकतात.

वृषभ रास – मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांनी या काळामध्ये सरस्वती देवीची पूजा करावी. वृषभ राशीच्या लोकांसाठी जी चांगले योग जुळून आले आहेत आणि म्हणूनच त्यांचे पैशा संबंधित सर्व अडचण दूर होईल परंतु कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. नोकरदार मंडळी त्यांच्या वरिष्ठांना कठोर परिश्रमाने संतुष्ट करू शकतात. पदोन्नती किंवा त्या संबंधित बोलणी आज होतील. मुलाने केलेल्या काही प्रशंसनीय कामामुळे मन प्रसन्न राहील.

तुळ रास – तुळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या प्रयत्नांमध्ये सर्वांगीण यश मिळेल आणि तुमची शक्ती वाढेल. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना मुलांच्या मदतीमुळे आनंद होईल. भगवंताचे ध्यान केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला सर्व उपक्रमांमध्ये आनंदाने मदत करतील. या काळामध्ये तुळशीच्या लोकांना त्यांच्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याच बरोबर या राशीच्या लोकांनी गणेशाला लाडू अर्पण करावा. वसंत पंचमी च्या दिवसापासून तूळ राशीचे लोक त्यांच्या संपर्कामुळे व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.

वृश्चिक रास – मित्रांनो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही हा काळ अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणणार आहे कारण या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहेत परंतु या राशीच्या हाडे आणि किडनीशी संबंधित आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा कठीण काळ असू शकतो. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकते. या राशीच्या लोकांनी गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. आज तुम्हाला मंगल कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *