मित्रांनो, घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेकडे असू नये असे आपले वास्तुशास्त्र सांगते. जर आपल्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेला असेल आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर अशा वेळी आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो हे उपाय केल्यानंतर वास्तुदोष त्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
मुख्य दरवाजा दक्षिणेकडे असू नये यामागचे कारण आपले भौगोलिक स्थान आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम आहे. सुर्य पुर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. पण त्याचा मार्ग सरळ नसतो तर वक्राकार असतो. तो दक्षिणेकडे वळून पश्चिमेकडे जातो.
दक्षिण बाजूला मुख्य दरवाजा ठेवल्यास साहजिकच सर्व जास्त वावराच्या खोल्या दक्षिणेकडे येतात. भर उन्हाळ्यात अशा खोल्यात वावरणे उष्णतेमुळे असह्य होते. यामुळे मुख्य दरवाजा पुर्व किंवा उत्तरेला ठेवावा, ज्यामुळे दुपारच्या तीव्र उन्हाच्या झळांचा त्रास कमी होतो आणि स्वच्छतागृहे नैॠत्य दिशेत ठेवावी ज्यामुळे तेथिल हवा गरम होऊन हानिकारक जिवाणू-विषाणू मारले जातील.
मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीचे पाय दक्षिण दिशेला करून ठेवतात. त्यामुळे दक्षिण बाजूला नकारात्मक ऊर्जा असते असे म्हटले जाते. कोणत्याही घराचे दार हे दक्षिणमुखी तर नसावे असे सांगण्यात येते. तुमचे दार दक्षिण बाजुला असेल, त्याला पर्याय म्हणून तुम्ही त्याच दारा समोर एक मोठा आरसा लावू शकता.
मित्रांनो या उपायामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. नकारात्मक ऊर्जेलाही घरात येण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हा उपाय तुम्हाला तेव्हा करायचा आहे.
जेव्हा तुमच्या घराचे मुख्य प्रवेश द्वार हे दक्षिण दिशेकडे असेल. तुम्हाला त्या दरवाजा समोर एक मोठा आरसा लावा. यामुळे हा वास्तुदोष नाहीसा होतो. आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वारा जवळ शौचालय नसावे. कारण घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मक शक्ती येण्याचा मार्ग होय. शौचालय हे सहसा आरोग्यासाठी चांगले मानण्यात येत नाही.
त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही येण्या साठी तुमचे सौचालय हे तुमच्या घरातल्या आतल्या बाजूला, एखाद्या कोपऱ्याच जवळ असणे अपेक्षित आहे. त्यामुळे कधीही आपण जिथूनही घरात प्रवेश करतो. त्याठिकाणी शौचालय बांधू नका. त्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा राहतो.
जर तुमचे घराचे मुख्य द्वार दक्षिण दिशेला असेल आणि यामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही गणेशाच्या मूर्तींची स्थापना नक्की करा. गणेशजीच्या 2 दगडी मूर्ती अशा प्रकारे मिळवा की त्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. मुख्य दाराच्या मध्यभागी चौकटीवर अशी मूर्ती ठेवा. यामुळे घरातील भांडणेही संपतील आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
जर दक्षिणमुखी घर किंवा दुकान असेल तर मुख्य दरवाजाच्या दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा. असे केल्याने मंगळाचा वाईट प्रभाव बराच संपतो. याशिवाय घरासमोर मोठी इमारत असली तरी मंगळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याचबरोबर जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल तर, दारासमोर एक आरसा अशा प्रकारे ठेवा की घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची पूर्ण प्रतिमा आरशात दिसेल. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा परत जाते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!