आपल्या देशातील बहुतांश महिला सध्या करिअरला प्राधान्य देताना दिसताहेत. यामुळे काहींचं लग्नाचं वय निघून जाते तर काही जणी करिअरची घडी नीट बसल्यानंतरच लग्न करण्याचा विचार करणं पसंत करतात. पूर्वी जेथे वयाच्या 18 व्या वर्षी मुलींचे हात पिवळे केले जात होते, तेथे आता लग्नाचे वय 25 वरून तिशीवर सरकत असल्याचं दिसतंय.
पण ज्या महिलांना करिअर करायचे आहे, त्या 32 ते 35व्या वर्षी लग्न करण्यास प्राधान्य देताहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला इतकी प्रगती करत असतानाही तिशीनंतर त्यांनी अविवाहित राहणे आजही चांगले मानले जात नाहीय.
यादरम्यान अशा महिलांना लोकांचे नको-नको ते टोमणे ऐकावे लागतात. काही लोक त्यांच्या चारित्र्यावरही बोटे दाखवू लागतात. या तीन महिलांनी त्यांना आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहे.
मी लग्न का करत नाहीय? – प्रेरणा सहाय यांनी सांगितलं की, ‘मी कुठेही जाते, प्रत्येकजण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करण्यास सुरुवात करतात. मी लग्न का करत नाहीय, हा लोकांचा नेहमीचा प्रश्न असतोच. पण मी एवढेच सांगेन की, मी सध्या माझ्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय.
त्यामुळे मी लग्नासाठी अजिबात तयार नाही. पण या मुद्यावर माझी मावशी सर्वाधिक जास्त मला काही-न्-काही ऐकवत असते. जणू मी काही तरी चुकीचंच बोलतेय. सत्य हे आहे की आपण तिशीपर्यंत लग्न केले पाहिजे. नाही तर हे जग तुमचा अपमान करण्याची एकही संधी सोडणार नाही’.
प्रेग्नेंसीदरम्यान निर्माण होतात समस्या – लक्षिता चक्रवर्ती यांनी सांगितलं की, ‘शेजारच्या काकूंकडून मी बहुतेकदा ऐकते की बेटा, तुझे लग्न कधी होणार? लवकर लग्न कर, नाहीतर तुला मुले होण्यास त्रास होईल. पण लग्नाचा विचार मी कधीच केला नाही. मग मुलांना जन्माला देण्याची कल्पना आली कुठून?
जोपर्यंत मी माझ्या करिअरमध्ये काहीतरी चांगले करत नाही तोपर्यंत मला लग्न करायचे नाही. अशा परिस्थितीत जेव्हा लग्नानंतर मुलांचा प्रश्न येतो, तेव्हा ज्यांना मूल होऊ शकत नाही, त्यांच्याकडे इतर पर्यायही असतात’.
आता तुला चांगला मुलगा भेटणार नाही – वर्षा कुरैशी यांनी सांगितलं की, ‘मी वयाच्या 33 व्या वर्षी लग्न केलं. कारण मला माझ्या आवडी-निवडीनुसार जोडीदार भेटतच नव्हता. त्या काळात बरेच लोक मला म्हणायचे की, आता माझे लग्नाचे वय उलटून गेलंय, त्यामुळे कोणताही चांगला मुलगा माझ्याशी लग्न करू इच्छित नाही. अशा गोष्टी ऐकून मला खूप वाईट वाटायचे.
कारण मी नेहमीच माझे लक्ष स्वतःचे कुटुंब स्थिर ठेवण्यावर केंद्रित केलेय. माझ्याकडे प्रेमसंबंधासाठी किंवा कोणालाही भेटण्यासाठी वेळ नव्हता. पण जेव्हा मी माझ्या पतीला भेटले तेव्हा त्यांनी मला समाजातील बुरसटलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास शिकवलं’.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद