हिंदू संस्कृतीत विड्याच्या पानाचे व सुपारीचे महत्त्व आहे. विविध प्रसंगी विड्याचे पान व सुपारी चा उपयोग केला जातो विड्याचे पान ज्या वेलीवर येतात त्याला नागवेली असे म्हणतात. माणसाचा जन्म झाल्यापासून ते मृ त्यू पर्यंत प्रत्येक कार्यामध्ये विड्याचे पान व सुपारी वापरली जाते. देव पूजेच्या वेळी देवासमोर विड्याचे पान व सुपारी ठेवण्याचा पूजाचार आहे. लहान बाळाचे बारसे असो पूजा अर्चा विवाहप्रसंग किंवा प्रत्येक करमणुकीच्या कार्यक्रमप्रसंगी पान व सुपारी दिली जाते.
तसेच मृत्यू वेळी सुद्धा विड्याच्या पानाचा वापर केला जातो. आपल्या भारत देशा विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या देशात राहतात. उत्सव सण एकच मात्र तो साजरा करण्याची पद्धत आणि त्याला दिले गेलेले नावे वेगवेगळी आहेत.
विड्याला तांबूल असेहि म्हणतात. कॉफी च्या झाडाला सुपारी सुद्धा म्हणतात सुपारीला मांगल्या व समृद्धीचे प्रतीक मानतात म्हणून कोणत्याही मंगल कार्यालयात पानसुपारी वाटली जाते.
त्याला चुना लावून त्यात सुपारी कात बडीशेप खोबरे इलायची जायफळ टाकले की पानाचा विडा तयार होतो. तो खाल्ला की जीब व ओठ लाल होतात. शिवाय ते जंतुनाशक कफनाशक मुखदुर्गंधी दूर करतो.
पानसुपारीला पती-पत्नीचे प्रतीक समजले जाते पुरुष विदूर असेल तर उजव्या कलटी ला सुपारी ठेवून मंगल कार्य करु शकतो अशा ठिकाणी सुपारीला त्याची पत्नी समजली जाते. साहित्य कारांमध्ये मध्ये कलाकारांमध्ये विड्याचा उपयोग आवडीने केला जातो. कारण विडा खाल्ल्यावर एकाग्रता वाढते. पान आणि सुपारी या दोघांचा एकत्र उल्लेख करत असला तरी पान व सुपारी यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
त्याशिवाय तंत्र साधने देखील पानाचा वापर आहे. देवाला नैवेद्य दाखवताना पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नेहमी नैवेद्य दाखवावा. कोणाकडे पण तांबोल दिल्यास तो देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच उपबोघावा. तसेच शुभ माननारी ही विड्याची पाने मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव बाहेर जाऊ देऊ नयेत.
पान खाने हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे पान खान किंवा विडा खान हा कौटुंबिक सुप्रतिष्ठा समजले जाते. जुन्या काळी ओसरीवर बसून लोक पान खात बसायचे पुरुषमंडळी पान खाऊन झालं की ते पानाचे ताट माज घरात नेले जायचे. तिथे स्त्रिया या ताटाची वाट बघत बसलेली असायच्या.
पूर्वीच्या वेळी पानसुपारी देण हा सुपुरस्कार होता. पूर्वी मित्र मंडळी पाहुणे जमले की त्यांच्या समोर पुढ्यात पानसुपारी ठेवले जायचे. धार्मिक दृष्ट्या विड्याच्या पानाचा तांबुल हा देवीला आवडणारा पदार्थ मानला जातो. कुलदेवी च्या कुलाचारामध्ये तांबोल हा आवर्जून ठेवण्यात येतो.
बऱ्याच देवांच्या मंदिरांमध्ये तांबोल हा प्रसाद म्हणून दिला जातो. आणि संतांचा आवडता पदार्थ तांबूल म्हणून ग्रंथांमध्ये उच्चार करण्यात आला आहे. पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर देवाच्या आंघोळीसाठी म्हणून केला जातो. आणि पानाने त्यांच्यावर जल अर्पित केलं जातं. एखाद्या जागेच्या शुद्धीसाठी पानाच्या विड्याच्या वापर केला जातो.
विड्याच्या पानात छोट्याच्या देतात श्री विष्णूंचा वास असतो पानाच्या मध्यभागी सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या टोकाला लक्ष्मी देवीचा वास असतो विडाच्या पानाच्या मागील बाजूस चंद्र देवाचा वास असतो. या वडाच्या सर्व पानाच्या कडेला परमेश्वराचा वास असतो.
हिरवीगार असणारी कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत. आणि थांबून म्हणून द्यावेत महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नवरा नवरीचे तोंडात विड्याची पाने घालून मगच त्यांना लग्नासाठी आणले जाते. तेलुगु बिहार पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान व सुपारी देऊन लग्नाचे बोलन करतात.किंवा शुभकार्याला सर्वात करतात.
जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात सर्वप्रथम वेड्या चे पान वापरतात त्याचे कारण म्हणजे पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने मोहिनी चे रूप धारण केले होते राहिलेले अमृत राक्षसांच्या हाती लागू नये म्हणून महिने ते अमृत हत्तीच्या खुटाजवळ ठेवले.
त्यानंतर या अमृता मधून एक हिरवीगार वेल निघाली नागाप्रमाणे ही वेल वर चढत गेली. म्हणून त्याला नागवेल म्हटले गेले. जेवणा नंतर या पानांचा विडा करून देव विडा खाऊ लागले. तर देवा समोर दक्षिणा ठेवताना नागवेलीचे पान सुपारी ठेवण्यात येऊ लागली तेव्हापासून तुझ्यासाठी विडाच्या पानाचे महत्त्व प्राप्त झाले.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!