माघ महिना सुरू असून कृष्ण महिन्यातली कृष्ण पक्षात एकादशी 27 फेब्रुवारीला येत आहे. कधी कधी एकाच पक्षात स्मार्त आणि भागवत अशा पाठोपाठ दोन एकादशी असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं आणि भागवत एकादशीला नाव नसतं.
हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानला जात. दर महिन्याला दोन एकादशी असतात. यंदा 26 फेब्रुवारीला विजया स्मार्त एकादशी आहे आणि 27 फेब्रुवारीला भागवत एकादशी आहे. या दोन्ही दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच पूजन केले जातात.
त्यामुळे याविषयी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास मनुष्याला प्रत्येक कामात विजय मिळतो, तसाच शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो, असं म्हणतात. वारकरी संप्रदायातील लोक भागवत एकादशीचा उपवास करतील, म्हणजेच 27 तारखेला व्रत करतील.
पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनी पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी पर्यंत असेल. याशिवाय विजया एकादशी तिथीला सर्वार्थ सिद्धि योग आणि त्रीपुष्कर योगही आहे. विजया एकादशीच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त दुपारी 12 वाजून 11 मिनिटांपासून ते 12 वाजून 50 मिनिटांनी पर्यंत असेल.
दुसरीकडे या दिवशी राहू काल संध्याकाळी 4 वाजून 53 मिनिटांनी पासून संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी पर्यंत असेल. तसेच पूजेसाठी त्यावर सात प्रकारची धान्ये ठेवावी, त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा आणि आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी सजवा.
मग वेदी तयार केल्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर श्रीहरीना पिवळी फुलं आणि फळं इत्यादी अर्पण करून धूप-दीप दाखवून आरती करा. शक्य असल्यास या दिवशी तुपाचा अखंड दिवा लावावा.
एकादशी व्रताची कथा वाचायला विसरू नका. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचीही पूजा करावी. तसेच पूजेत फळं, फुलं, गंगाजल आणि धूप दीप आणि नैवेद्य इत्यादी ईश्वराला अर्पण करावं. या व्रतामध्ये दिवसभर उपवास करावा लागतो, तसे जमत नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता.
या उपवासात फळांचा रस देखील तुम्ही घेऊ शकता. एकादशी तिथीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या तिथीस पुन्हा विष्णूची पूजा करावी. मग त्यानंतर अन्नदान करावे आणि मग उपवास सोडावा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!