विनायक चतुर्थी 2022 : आज गणपती बाप्पांना चुकूनही अर्पण करू नका ही वस्तू, अन्यथा…

भगवान श्रीगणेश ही प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्याची सुरुवात जर आपण श्री गणेशाची मनोभावे पूजा करून केली तर ते कार्य सिद्धीस जातं. ते कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. निर्विघ्नपणे ते कार्य पार पडतं. 4 फेब्रुवारी शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील गणेश जयंती. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या

चतुर्थीला गणेश जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. कारण या दिवशी पृथ्वीवर गणेश लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात, त्यामुळे त्या दिवशी जी व्यक्ती भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा करते. त्यांच्या आराधना करते, बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करते त्यावेळी तिच्या सर्व दुःखांचा संकटांचा श्री गणेश नाश करतात आणि

म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा करावी. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की जास्वंदी फुल, दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पा दाखवायचा आहे. मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे एक वस्तू जी गणपती बाप्पांचे पूजेमध्ये वापरू नये. ती वस्तू म्हणजे

तुळशीपत्र होय. त्यामुळे चुकूनही तुळशीपत्र गणपती बाप्पांना अर्पण करू नका. तसेच आपण जेव्हा गणपती बाप्पा जो नैवेद्य अर्पण करणार आहोत, यावर देखील तुळशीपत्र ठेवू नका. भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये आपण तुळशी पत्राचा वापर करत असतो. कारण त्यांना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहेत. मात्र गणपती बाप्पांची पूजा करताना त्यामध्ये तुळशी पत्राचा वापर चुकूनही करू नका. तसेच

या दिवशी तीळापासून बनलेले पदार्थ खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तीळपासून बनलेल्या एखादा पदार्थ गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून नक्की करा. यामुळे सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी संपूर्ण परिवाराची म्हणजेच भगवान भोलेनाथ, माता पार्वती आणि कार्तिकेय यांचीसुद्धा पूजा अवश्य करावी. या दिवशी काही छोटे-छोटे उपाय सुद्धा आपण करू शकतो. गणपती हे दुःख आणि

संकटांचा नाश करणारे आहेत, त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये एकच संकट आलेलं असेल. त्याचा नाश व्हावा यासाठी गणेश जयंतीला आपण गणेश कवच स्तोत्र पठण करायचा आहे. तुम्ही स्तोत्र सात वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा सुद्धा पठण करू शकता. यामुळे तुमच्या जीवनामध्ये संकट येणार असेल तर ते संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील. त्यानंतर तुम्हाला जर धन संबंधित काही समस्या असतील किंवा

घरात पैसा टिकत नसेल. नोकरी नसेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या आसपास जिथे कुठे गणपती बाप्पांचा मंदिर असेल तिथे जायचे आहे आणि 21 दुर्वांच्या 21 जोड्या आपल्याला गणपतीबाप्पांना अर्पण करायचे आहेत. तुम्ही दुर्वांच्या जुड्याची माळ बनवून देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. तसेच एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून गणपती बाप्पा जवळ आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती मनोभावे बोलून दाखवायचे आहे.

ते पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तसेच धन संबंधित काही समस्या असतील तर सुद्धा गणपती बाप्पा दूर करतील. तुमचं एखादं कार्य अनेक प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसेल त्यामध्ये अनेक अडथळे येत असतील तर ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी म्हणजे त्या कार्यांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी गणेश जयंतीला गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ज्या कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा राहते ते घरामध्ये सर्व शुभ आणि मंगल घडतं. त्यामुळे या गणेश जयंती हे काही छोटे-छोटे उपाय तुम्ही नक्की करावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *