हिरण्यकशिपु नावाचा एक दैत्य होता. देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही त्याला मृ’त्यु येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर सं’तुष्ट होऊन दिल्यामुळे, तो फार उ’न्मत्त झाला होता. त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी सहाजिकच होते. त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद. तो मुलगा मात्र विष्णूभक्त निपजला.
त्याचे त्या हिरण्यकशिपुने फार हाल केले. अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहीले, पण देव तारी त्याला कोण मारी? अखेर दरवेळी मृत्यूमुखांतून प्रल्हाद सुखरूप परत आलेला पाहून, हिरण्यकशिपु प्रल्हादाला म्हणाला,” काय रे कारट्या, तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे?”
“बाबा, तो चराचरात सर्वत्र आहे.” “महालाच्या या खांबात आहे का?” “हो आहे.” ते ऐकताच हिरण्यकशिपुने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेंव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपांत श्रीविष्णु बाहेर पडले. तोच त्यांचा नरसिंहअवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपुला त्या महालाच्या उंबरठय़ावर, आपल्या मां’डीवर घट्ट पकडून ठेऊन, त्याचे पो’ट फा’डून ठार मारले.
अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा व’ध त्याला मिळालेल्या विचित्र वरावर मात करून श्रीविष्णूंने केला खरा; परंतु त्या दैत्याच्या पोटात जे का’लकूट वि’ष होते, ते त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या न’खांत भरले. त्यांच्या नखांंचा दा’ह होऊ लागला. ती भ’यंकर तापली होती. या वेळी महालक्ष्मीने, मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व श्रीनृसिंहंना त्या फळांत आपली न’खे खूपसावयाला सांगितले.
त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांंच्या नखांंचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाला. तेंव्हा लक्ष्मीवर विष्णु प्रसन्न झालेच, परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला,
“हे औदुंबरवृक्षा, तुला सदैव फळे येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिध्द होईल. तुझे भक्तिने पूजन करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझे दर्शन होताच उग्र विष्णुसुद्धा शांत होईल. ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी तुला नियमित प्रदक्षिणा घालताच अपत्यप्राप्ती होईल.” औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच.
दत्त भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदीच क्षुद्र असतो. पत्रिकेत अ’निष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरूदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मा’नसिक त्रा’स, घोर अपमान पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुर्नजीवन देतात. तसेच अवतारी पुरूष त्यांच्या आश्रितांचे दु:ख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पु’र्नज’न्मप्रदान करतात.
दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ति देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राण शक्तिव्दारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुध्दिचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ति औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीरव्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते.
भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राण शक्ति भक्ताच्या श’रीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ति परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय असतात.”
औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!