ज्योतिषशास्त्रानुसार लग्न जुळवण्यासाठी हे गुणमिलन फार महत्त्वाचं आहे. शास्त्रानुसार एकूण 36 गुण आहेत. वर आणि वधूचे लग्न होण्यासाठी कमीत कमी 18 गुण जुळणं आवश्यक आहे. अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असं आपण ऐकतो. पण पत्रिकेमध्ये जुळवण्यात येणारे हे 36 गुण नक्की असतात तरी काय आणि पत्रिका जुळवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात जाणून घेऊयात…
आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह करताना वर आणि वधूची पत्रिका (कुंडली) जुळवली जाते. यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजेच वर आणि वधूचे किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. याच आधारावर त्यांचं लग्न शक्य आहे किंवा नाही हे देखील ठरवलं जातं. पत्रिकेमधील किमान 18 गुण जळले तरच लग्न होऊ शकतं नाहीतर लग्न लागू शकत नाही असं सांगितलं जातं. दोघांचेही वैवाहिक आयुष्य सुखी, सामाधानी असावं यासाठी पत्रिका जुळवून पाहिल्या जातात.
किती गुण जुळल्यावर विवाह होतो? लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणं योग्य मानलं जातं. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण आढळल्यास गुणमेलन मध्यम मानलं जातं. यापेक्षा जास्त जुळले, तर त्याला शुभ विवाह मिलन म्हणतात. कोणत्याही वधू-वराला 36 गुण जुळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम आणि माता सीतेचे 36 गुण जुळले होते.
ते 36 गुण कोणते? विवाह जुळवण्यासाठी पत्रिकेमधील अष्टकूट गुण जुळतात की नाही ते पाहिलं जातं. यामध्ये नाडी संदर्भातील आठ गुण, भटूकचे सात गुण, गण मैत्रीसंदर्भातील सहा गुण, ग्रह मैत्रीसंदर्भातील पाच गुण, योनि मैत्रीसंदर्भातील चार गुण, ताराबलाचे तीन गुण, दोन गुण वश्य आणि एक गुण वर्षाचा असतो. या प्रकारे एकूण 36 गुणांची तुलना करुन ते जुळतात की नाही हे पाहिलं जातं.
या गोष्टी लक्षात ठेवा – हिंदू धर्मात लग्न जुळवताना कुंडली पाहण्याची खूप जुनी परंपरा आहे. आजही ही परंपरा पाळली जाते. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. जर कोणाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, तर त्याचे लग्न फक्त मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबतच करावं. त्याने मंगळ दोष नसलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये. लग्न झाले तर ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी ते चांगले मानले जात नाही.
असे असेल तर.., लग्न करणं टाळावे – जर तुमच्या पत्रिकेचे गुणमिलन 18 गुणांपेक्षा कमी म्हणजेच 17 गुणांपर्यंत असेल, तर तुम्ही लग्न करू नये. 18 पेक्षा कमी गुण जुळल्यानंतर लग्न केल्यास अशा वधूवरांचे वैवाहिक जीवन आनंदी राहत नाही. त्यामुळे अशावेळी लग्न करणं टाळलंए पाहिजे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!