क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? – क्रिप्टोकरन्सी हा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. सर्वात आधी क्रिप्टो करन्सीचा मराठीत अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊया, या शब्दाचा अर्थ आहे गुप्त असे चलन. क्रिप्टो हा लॅटिन शब्द आहे जो क्रिप्टोग्राफीपासून बनलेला आहे आणि ज्याचा अर्थ लपलेला आहे. तर चलन देखील लॅटिन मधून आले आहे, जे पैसे-पैशासाठी वापरले जाते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी म्हणजे छुपा पैसा. किंवा गुप्त पैसा. किंवा डिजिटल रुपया.
सर्वसाधारणपणे, क्रिप्टोकरन्सी हा एक प्रकारचा डिजिटल पैसा आहे, ज्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, परंतु तुम्ही ठेवू शकता. म्हणजेच हे चलनाचे डिजिटल स्वरूप आहे. ते नाणे किंवा नोटासारख्या ठोस स्वरूपात तुमच्या खिशात नसते. हे पूर्णपणे ऑनलाइन घडते. क्रिप्टो करन्सी हे एक डिजिटल चलन आहे ते आपण फक्त ऑनलाईनच वापरू शकतो. हे चलन नाणी किंवा नोटांमध्ये रूपांतरित करता येत नाही, सध्या बाजारामध्ये पाच हजार पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सीचे प्रकार आहेत. आधी फक्त क्रिप्टो करेंसी मध्ये बिटकॉइनचा समावेश होता पण आता अनेक प्रकारचे कॉईन बाजारामध्ये उपलब्ध आहे.
तर, मित्रांनो क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? बिटकॉइन म्हणजे काय? यामध्ये आपण किती रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो? ही करन्सी कायदेशीर आहे का? याचे फायदे तोटे काय? ही आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने क्रिप्टो करन्सीचा नेमका अर्थ काय आहे.
जेव्हा आपण ठराविक रकमेचे पैसे दुसऱ्याला देतो तेव्हा, ते जसे आपल्या पाकिटातून दुसऱ्याच्या पाकिटामध्ये जाते. त्याच प्रमाणे क्रिप्टो करन्सी मध्ये बिटकॉइं एकमेकांना देण्यासाठी पाकीट असते. क्रिप्टो करन्सी मधील पाकीट हे अनेक प्रकारचे असू शकते जसे तुम्ही वापरत असलेला कॅम्पुटर, मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, इत्यादी. अशा अनेक ठिकाणी आपण क्रिप्टो करन्सी चे चलन जमा करू शकतो.
बिटकॉइन घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे अकाउंट जर व्हॅलिड असेल तर त्या व्यक्तीला मायनर्स असे म्हणतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एक बिटकॉइंन पाठवते तेव्हा त्याची नोंद केली जाते त्याला ट्रांजेक्शन हिस्ट्री असे म्हणतात. ही नोंद लेजर मध्ये होत असते, या ट्रांजेक्शन यामध्ये कोणीही फेरफार करू शकत नाही.
ह्या पब्लिक लेझर मध्ये अनेक ब्लॉकस असतात आणि त्या ब्लॉक्स मध्ये ट्रांजेक्शन ची नोंद असते,याला ब्लॉकचेन असे म्हणतात. या क्रिप्टो करन्सीमध्ये एक गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असते असे काहीही नाही,आपण शंभर रुपयांपासून सुद्धा सुरुवात करू शकतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कॉइनस्विच कुबेर ह्या आपलिकेशनचा वापर करू शकता.
या ॲपच्या मदतीने तुम्ही 75 पेक्षा जास्त क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करू शकता. आत्तापर्यंत 90 लाख पेक्षा जास्त लोकांनी हे ॲप इन्स्टॉल केलेली आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि काही मदत लागल्यास यांच्या कस्टमर केअरला फोन लावू शकता.
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड द्वारे हे ॲप लिंक असल्यामुळे यामध्ये फसवेगिरी चा काहीही संबंध येत नाही. आणि हे ॲप तुमच्या आधार कार्ड बरोबर केवायसी केले जाते त्यामुळे यात फसवेगिरी होऊ शकत नाही,नवीन लोकांना गुंतवणूक शिकण्यासाठी हे ॲप फायदेशीर आहे.
आता आपण क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे होणारे फायदे पाहूया, या क्रिप्टो करन्सीवर कोणत्याही देशाचे, सरकारचे नियंत्रण व नियम लागू नाहीत. ब्लॉकचेन या यंत्रणेमुळे ही करन्सी सुरक्षित मानली जाते, अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी क्रिप्टो करन्सीला चलन म्हणून स्वीकारले देखील आहे आणि आपल्या भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला सरकारने मान्यता देखील दिलेली आहे. परंतु या पॉईंटचा वापर करून कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री करण्यास सरकारने अजून परवानगी दिली नाही.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!