मुलींना कोणत्या प्रकारचा मुलगा हवा हे त्यांना चांगलं माहीत असत, पण योग्य मुलगी निवडण्यात मात्र मुलं गोंधळत असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देत आहोत.
लग्न म्हणजे हा एक असा लाडू आहे जो की खायला बरेच लोक खूप घाबरत असतात. विशेषतः मुलांच्या मनात हा प्रश्न नेहमी निर्माण होत असतो की त्यांनी कोणत्या मुलीशी लग्न करावे?
तर तुम्ही अशा मुलीशी लग्न करावे – घरची सून ही घराची शान असते. त्यामुळे मुलीचे वागणे आणि बोलणेही कसे आहे हे तपासा. अपमानास्पद किंवा कडू शब्द बोलणाऱ्या मुलींपासून दूर राहा. मनमिळावू स्वभाव असलेल्या मुलीसोबत तुम्ही लग्न करा.
मुलीमध्ये संयम असणे देखील आवश्यक आहे. तिला खूप राग आला तर तिला सासरच्या घरात जुळवून घेता येत नाही. संयम आणि प्रेमाने सर्वकाही कसे हाताळायचे ज्या मुलीला माहित असते त्या मुलीसोबत लग्न करायला पाहिजे.
त्या मुलीचे आणि तुमचे विचार एकमेकांना पटतात की नाही हे देखील पहा. काहीवेळा लोक भिन्न विचार असताना एकमेकांसोबत जुळवून घेऊ शकत नाहीत. मात्र, इतरांच्या मतांचा आदर असेल तर ते जुळवून घेऊ शकतात.
आजकालच्या मुलींना घरची कामे करायला तितकसं आवडत नाही. आता तुम्ही तुमच्या घरी चांगला नोकर सुद्धा ठेवू शकता. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हालाच घरातील काही कामे करावी लागत असतात. आणि अशा परिस्थितीत सांभाळून घेण्यासाठी कामात आळशी नसलेली मुलगी तुम्ही स्वतःसाठी निवडा.
आदर ही अशी गोष्ट आहे जिला लोक पैशापेक्षा जास्त महत्व देत असतात. त्यामुळे घरातील मोठ्यांसह सर्वांचा आदर करणारी मुलगीच तुम्ही निवडली पाहिजे मात्र, त्या बदल्यात तुम्हालाही तिला तो आदर, मान आणि सन्मान द्यायचा आहे.
मुलगी अशी असावी की ती घर आणि तिचा खर्च दोन्ही चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल. जास्त खर्च करणारी किंवा कुटुंबाचा विचार लक्षात न घेणारी मुलगी लग्नासाठी धोकादायक ठरू शकते.
त्या मुलीला गर्व नसावा. कारण फक्त हा अहंकार च असा आहे जो घरात भांडणाचे कारण बनतो. म्हणून अशा मुलीशी लग्न करा जी समजूतदार आणि मैत्रीपूर्ण असेल.
तूम्ही त्याच मुलीशी लग्न करा जी मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार असेल. पालकांच्या दबावाखाली बळजबरीने लग्न करणाऱ्या मुलींपासून तुम्ही शक्य तितके दूरच राहा. कारण या मुळे तुमचे आयुष्य नंतर उध्वस्त होऊ शकते.
मुलगी अशी असावी की जिच्यात संघर्ष आणि त्रास सहन करण्याची ताकद असेल. कारण वेळ ही नेहमीच चांगली नसते. तर अशा परिस्थितीत मुलीने अडचणीच्या वेळी तुमची साथ सोडली नाही पाहिजे.
स्वप्न पाहणे ही चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येकाच्या सगळ्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि त्या कधीच संपत नाहीत असे झाले नाही पाहिजे. किंवा मग त्या पूर्ण करण्याच्या नादात मुलीने काही चुकीचे करू नये. म्हणून, मुलगी निवडताना, ती अती डिमांड करणारी तर नाही ना हे पहा.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!