अजब दुनिया,गजब लोग ही म्हण खूपच लागू होते, आजकाल इंटरनेट वरती कोणत्याही ठिकाणी कुणीही काहीही करू शकते. ज्यामुळे बऱ्याच अजब गोष्टी कानावर प’डतात, पहायला मिळतात. बघताच प्रेमात पडणे ही गोष्टी ऐकलीय, पण चॅटिंग करता करता कधी यांचं होऊन गेला कळलंच नाही असे म्हणावे लागेल.
मग ते आपल्या भागात असो, बाहेरहून असणाऱ्या लोकांसोबत सुद्धा असू शकते. सोशल मीडियाशिवाय तरुणांचा एक मिनिट जात नाही. प्रेम देखील सोशल मीडियामध्ये होते आणि लग्न देखील तिथेच ठरवले जाते. पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये भारतातील एक तरूण एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडला होता.
अमृतसरच्या तुंगबाला भागात स्कूटर मेकॅनिक काम करण्यासाठी त्याच गॅरेज आहे , दोघांची फेसबुकवर भेट झाली हल्ली हे काय नवीन नाही पण जे झालं ते दोघांनी निभावले हे विशेष. नेहमीप्रमाणे दोघे सुरुवातीला मित्र झाले आणि सात महिन्यांनंतर ती मुलगी चक्क अमेरिकेतून थेट लग्नासाठी अमृतसरला आली.
अमृतसरच्या तुंगबाला भागात राहणाऱ्या स्कूटर मेकॅनिक पवन कुमारने फेसबुकवर अमेरिकेतल्या एमिलीशी मैत्री केली. संवाद हळूहळू वाढू लागला. मैत्रीच रूपांतर हळूहळू प्रेमात बदलल. मग एक दिवस एमिली अचानक स्कूटर मेकॅनिक पवन कुमारच्या घरी आली. एमिलीला पाहून पवन कुमारच्या कुटूंबाला ध-क्का बसला.
ती अशी येईल असं वाटलंच नव्हतं तेही लग्नासाठी ! जिला हिंदी व पंजाबी दोन्ही येत नव्हते. पण पवनकुमारचे कुटुंब या गोष्टीला पचवायला उशीर झाला तरी लग्नामुळे खूप खुश झाले होते आणि त्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. पवन कुमारच्या कुटूंबाला इंग्रजी येत नाही.
परंतु, एमिली तिच्या सासरी हावभाव करते. सासू-सासरे हावभावातुन सुनेचे शब्द ओळखतात. पवन अनेकदा एमिलीला म्हणायचा, “मी तुझ्यावर प्रेम करतो.” पवन म्हणाला, एमिलीशी बोलण्या येण्याइतपत इंग्रजी त्याला माहित आहे. एकदा गप्पा मारत असताना एमिली लग्नाविषयी बोलली आणि पवन लग्नाला हो म्हणून बोलला.
एमिलीला पवन अमेरिकेत यावा अशी इच्छा होती. परंतु, पवनची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून एमिली लॉ’कडाऊन संपताच सर्व आवश्यक परमि’शन घेवून भारतात अमृतसरला आली. येथे पवनच्या कुटुंबीयांनी दोघांचे आनंदाने लग्न लावून दिले. प्रेमाला नाही देश कळतो, नाही सीमा व भाषा कळते याचंच हे उदाहरण.
आई शकुंतला म्हणाली की आपल्या मुलाने अमेरिकन मुलीशी लग्न केले याचा मला आनंद आहे. वडील शेरचंद म्हणाले की जर मुले आनंदी असतील तर कुटुंबही खुश राहील. एक अनोखा संगम विवाह पंजाब मध्ये पार पडला. दोघांनी एकमताने सुखाने संसार करण्याची तयारी दाखवली हे सर्वात महत्वाचे कारण आजकालच्या लि’व्ह इन च्या जमान्यात असा ठाम निर्णय म्हणजेच आदर्श निर्णय. उठसूट भांडून नात्यात दुरावा आणि ब्रेकअप करणाऱ्या तरुणाईला हे उत्तम उदाहरण राहील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद