अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून आपण त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकतो. तसेच त्याच्या आवडी-निवडीही आपल्याला समजू शकतात. मानवी जीवनात अंकशास्त्राच्या अनुसार संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. काही अंक आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात याची सर्वांना कल्पना असेल.
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूलांक कळतो आणि मूलांकाच्या आधारे भविष्य. अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मूलांकांमधील ७ व्या मुलांका बद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो मूलांक ७ असलेले लोक मनाने शुद्ध असतात आणि काहीवेळा लहानग्या गोष्टीही त्यांना दुःखी करतात. प्रे’माच्या बाबतीत त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात चढ-उतार येत असतात. पण हे लोक चांगले वक्ते आहेत. ते कोणत्याही विषयात चांगल्या प्रकारे बोलू शकतात त्यांचे मत मांडू शकतात. यांच्यामध्ये कल्पनाशक्ती प्रखर आहे. हे लोक बुद्धिमान, निर्भय आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात.
मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार १,१०,१९,२८ या तारखेला जन्म घेणारे लोक, त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. यांना वात प्रकृतीचा त्रास होतो. पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. त्यांनी माणिक वापरायला हरकत नाही.
त्याचबरोबर जर तुमची जन्मतारीख ७ ,१६, २५ यांपैकी असेल तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ७ ,१६ आणि २५ या तारखेला जन्म घेणाऱ्या व्यक्तींचा शुभ अंक ७ आहे. या व्यक्ती अतिशय शांतताप्रिय आणि क्रिएटिव्ह विचाराच्या असतात. अजिबात आक्रस्ताळेपणा यांच्याकडे नसतो आणि या व्यक्तींचा निरागस पणाच सर्वांना भावतो.
त्यामुळेच या व्यक्ती सर्वांना खूप आपल्याशा वाटतात. पण या व्यक्तींमध्ये लीडरशिप खूपच चांगली असते. अतिशय सोपी आणि भावणारी अशी लाईफस्टाईल या व्यक्तींना आवडते. त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार नशीब कधीही या व्यक्तींच्या बाजूने नसलं तरीही या व्यक्ती कधीही नशीबावर अवलंबून राहात नाहीत.
अतिशय मेहनती आणि स्वतःच्या मेहनतीने या व्यक्ती आयुष्यात सर्व काही मिळवतात. यांचं आयुष्य खूपच सोशल असून अतिशय भावनिक असतात. मित्रांनो आता आपण इतर जन्मतारीख असलेल्या लोकांविषयी सुद्धा माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २, ११, २० तारखेला झालेला असेल तर असे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना दु:खं पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही.
३, १२, २१, ३० या तारखांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लाभल्यावर सर्व क्षेत्रात त्यांची आघाडी दिसून येते.
४, १३, २२, ३१ या तारखांचे लोक टोकाचे आस्तिक नाहीतर टोकाचे नास्तिक असतात. पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार त्यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे.
५,१४,२३ जन्मतारिख असणारे लोक अतिशय हुशार असतात. परंतु, हे लोक पटकन नाराज होतात. त्यांना अपमान सहन करता येत नाही. सतत सर्दीने बेजार असतात. त्यांचा स्वामी आहे बुध आणि बुधाचे रत्न आहे पाचू. अशा लोकांनी पाचू धारण करण्याआधी तो नीट पारखून घ्यावा. या जन्मतारखेच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडावी. तसेच त्यांना कायदेविषयातही गती प्राप्त होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!