3 मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.
ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले “मडकं दे”.
तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका”.
खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, “मग काय
म्हणतात याला?”.
“स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला ‘केळी’ व
स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला ‘करा’ म्हणतात”. माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.
मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती झाली.
पाण्याचा – माठ, अंत्यसंस्काराला-मडकं, नवरात्रात- घट
वाजविण्यासाठी-घटम् , संक्रांतीला – सुगडं, दहिहंडीला- हंडी, दही लावायला- गाडगं, लक्ष्मीपूजनाचे- बोळकं, लग्न विधीत – अविघ्न कलश, आणि, अक्षय्य तृतीयेला- केळी व करा
खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच. मला मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात
हे माहिती होते पण अक्षय तृतीयेला केळी व करा
म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला माहीत होते का ?
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!